Join us
Daily Top 2Weekly Top 5

१४ वर्षांचा संसार मोडला, घटस्फोटानंतर माहीने जयकडून किती कोटींची पोटगी घेतली? मोठी माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 12:50 IST

सध्या टीव्ही क्षेत्रातले लोकप्रिय जोडपे जय भानुशाली आणि माही वीज त्यांच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे.

Mahhi Vij-jay Bhanushali Divorce : घटस्फोट म्हटला की त्यासोबतच पोटगी हा विषय सुद्धा येतो. अनेक अभिनेत्रींनी घटस्फोटाच्या वेळी पोटगी म्हणून कोट्यवधी रुपयांची मागणी केल्याची किंवा स्वीकारल्याची उदाहरणे आपण आजवर पाहिली आहेत. मात्र, टीव्ही अभिनेत्री माही विजने जय भानुशालीपासून वेगळे होताना पोटगी घेण्यास नकार देऊन सर्वांनाच चकित केले आहे.

जय भानुशाली आणि माही विज यांनी ४ जानेवारी २०२६ रोजी अधिकृतपणे वेगळं झाल्याची घोषणा केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, जय आणि माहीने आपलं लग्न वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, गेल्या काही काळापासून त्यांच्यातील मतभेद मिटण्याचं नाव घेत नव्हते. अखेर आपलं नाते अधिक ताणण्यापेक्षा ते सौहार्दपूर्णपणे संपवण्याचा निर्णय या जोडीने घेतला. ९ फेब्रुवारी २०११ रोजी विवाहबंधनात अडकलेल्या या जोडीचा १४ वर्षांचा प्रवास आता संपला आहे.

पोटगी घेण्यास माहीचा नकारया घटस्फोटातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माही विजने घेतलेला निर्णय. कायदेशीर सूत्रांनुसार, माहीने जयकडून कोणतीही पोटगी किंवा मुलांच्या देखभालीसाठी पैसे घेण्यास नकार दिला आहे. कोणत्याही आर्थिक वादाशिवाय हे प्रकरण सामोपचाराने मिटवण्यावर दोघांचेही एकमत झाले आहे.जय आणि माही जरी पती-पत्नी म्हणून वेगळे झाले असले, तरी ते त्यांच्या तीन मुलांचे  तारा, खुशी आणि राजवीर यांचे संगोपन मात्र एकत्रच करतील.

माही विज आणि जय भानुशालीनं २०१७ मध्ये त्यांच्या केअरटेकरच्या दोन मुलांना खुशी आणि राजवीर यांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. २०१९ मध्ये त्यांना 'तारा' ही मुलगी झाली. पालक म्हणून असलेल्या आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये कोणतीही कसर सोडणार नसल्याचं या दोघांनी स्पष्ट केलं आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Mahhi Vij and Jay Bhanushali divorce after 14 years; no alimony.

Web Summary : TV actress Mahhi Vij and Jay Bhanushali officially divorced in 2026 after 14 years. Mahhi refused alimony, choosing a peaceful resolution. They'll co-parent their three children, Tara, Khushi, and Rajveer, continuing their parental responsibilities together.
टॅग्स :जय भानुशालीघटस्फोट