Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसाद खांडेकरने घेतला ब्रेक, अमेरिकेला झाला रवाना, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 13:25 IST

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून विनोदवीर प्रसाद खांडेकरने ब्रेक घेतला आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा प्रेक्षकांना खळखळून हसवणारा शो. या शोमधील विनोदवीरांची चर्चा नेहमीच होत असते. या कार्यक्रमातील असाच एक विनोदवीर म्हणजे प्रसाद खांडेकर. अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशी प्रसाद खांडेकरची ओळख आहे. हिंदी आणि गुजराती रंभभूमीवरही त्याने लेखक दिग्दर्शक म्हणून आपला ठसा उमटविला आहे. कित्येक वर्षांपासून प्रसाद चाहत्यांचं मनोरंजन करतोय. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो घराघरात लोकप्रिय झाला. मात्र त्याने आता  ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून ब्रेक घेतला आहे.

प्रसाद सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो चाहत्यांच्या संपर्कात असतो. प्रसाद अमेरिकेला निघाला आहे. त्याने मुंबई एअरपोर्टवरचे फोटो शेअर केले आहेत. 

प्रसादसोबत या फोटोत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील इतर मंडळीसुद्धा दिसतायेत. प्रसाद, नम्रता संभेराव, पॅडी आणि विशाखा सुभेदार 'कुर्रर्रर्रर्र’ या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर निघाले आहेत. प्रसादबरोबरच नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार, पंढरीनाथ कांबळेचेही  ‘कुर्रर्रर्रर्र’ नाटकामध्ये महत्त्वाची भूमिका आहे. 

 प्रसादची पत्नी, आई, मुलगा त्याला सोडण्यासाठी मुंबई विमानतळावर आले होते. कुटुंबियांबरोबर त्याने सेल्फीही घेतला. प्रसाद फोटो शेअर करत म्हणाला, “गुड बाय मुंबई. ‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकासाठी युएस टूरला निघत आहे”.  

 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रा