Join us
Daily Top 2Weekly Top 5

"संपूर्ण जगात तुझ्या नावाचा...", समीर चौघुलेंच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:41 IST

समीर चौघुलेंसोबतचा फोटो शेअर करत नम्रता संभेराव लिहिते...

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमाचा मोठा चाहतावर्ग आहे. या कार्यक्रमामुळे महाराष्ट्राला अनेक हास्यमहारथी मिळाले. नम्रता संभेराव, समीर चौघुले, गौरव मोरे, ओंकार राऊत, प्रसाद खांडेकर, वनिता खरात, ईशा डेसह सर्वच कलाकार आज स्टार झालेत. सर्वांचे लाडके समीर चौघुले यांनी काल वाढदिवस साजरा केला. फक्त प्रेक्षकच काय तर इतर हास्य कलाकारही समीर दादाचे चाहते आहेत. समीर चौघुलेंच्या (Samir Choughule) वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावने (Namrata Sambherao) खास पोस्ट शेअर केली आहे.

समीर चौघुलेंसोबतचा फोटो शेअर करत नम्रता संभेराव लिहिते, "सॅम दादा,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुझ्यासारखा तूच आहेस. तुला प्रत्यक्ष काम करताना पाहणं आणि तुझ्यासोबत काम करणं निव्वळ सुख, मी तुझी मोठी चाहती आहे. संपूर्ण जगात तुझ्या नावाचा डंका वाजतोय, आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. तू आयुष्यभर असाच एनर्जेटिक राहा. तू आमची प्रेरणा आहेस."

नम्रताच्या या पोस्टवर समीर चौघुलेंनी 'खूप प्रेम' अशी कमेंट केली आहे. समीर चौघुले गेल्या २५ वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहेत. ते केवळ अभिनेतेच नाही तर लेखकही आहेत. त्यांनी अनेक विनोदी भूमिका केल्या आहेत. मात्र महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाने त्यांना कमालीची प्रसिद्धी, प्रेम दिलं. त्यांच्या स्टाईलची मिमिक्रीही होऊ लागली. आज ते लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांचेच लाडके आहेत. नुकतेच ते 'गुलकंद' सिनेमात दिसले. सई ताम्हणकर सिनेमात त्यांची अभिनेत्री होती.  इतक्या वर्षात मुख्य अभिनेता म्हणून हा त्यांचा पहिलाच सिनेमा होता. 

टॅग्स :समीर चौगुलेनम्रता आवटे संभेरावमराठी अभिनेतामहाराष्ट्राची हास्य जत्रा