Join us  

फिल्टरपाड्याच्या बच्चनवर DDLJ चा फिव्हर; डबलडेकर बसमध्ये गौरवने रिक्रिएट केलं शाहरुखचं गाणं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2023 11:24 AM

Gaurav more: गौरवचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे गौरव मोरे (gaurav more). उत्तम अभिनयशैली आणि विनोदकौशल्य यांच्या जोरावर गौरव अल्पावधीत लोकप्रिय झाला. कलाविश्वासह सोशल मीडियावरही सक्रीय असलेल्या गौरवचा एक भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्याने डीडीएलजे म्हणजेच 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे' या सिनेमातील शाहरुखचं लोकप्रिय गाणं रिक्रिएट केलं आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या गौरवने अलिकडेच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो डबलडेकर ओपन बसमध्ये बसला असून त्याने शाहरुख खानचं 'हो गया हैं तुझको तो प्यार सजना' हे गाणं रिक्रिएट केलं आहे. विशेष म्हणजे त्याने परफेक्टपणे शाहरुखची कॉपी केली आहे. त्यामुळे त्याचा हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

दरम्यान, गौरव लवकरच बॉईज 4 या सिनेमात झळकणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते या सिनेमाची आतुरतेने वाट पाहात आहे. गौरव त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या हटके हेअर स्टाइलमुळेही चर्चेत येत असतो. मात्र, मध्यंतरी एका सिनेमासाठी त्याने त्याचे केस कापले होते. गौरवचं “आय एम गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा” हे वाक्य प्रचंड गाजलं आहे. त्यामुळे फिल्टर पाडा या टोपणनावानेही तो बऱ्याचदा ओळखला जातो. 

टॅग्स :टेलिव्हिजनमहाराष्ट्राची हास्य जत्राशाहरुख खानबॉलिवूड