Join us  

Vishakha Subhedar : नादखुळा! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम विशाखा सुभेदारचे हे डान्स व्हिडीओ तुम्हालाही वेड लावतील...!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 8:00 AM

Vishakha Subhedar : स्टॅण्ड अप कॉमेडीयन व अभिनेत्री विशाखा सुभेदार हिची बातच  न्यारी... विशाखा स्टेजवर आली रे आली की हास्याचे कारंजे फुटतात. हीच विशाखा उत्तम डान्सर आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? तिने शेअर केलेले व्हिडीओ हे सांगायला पुरेसे आहेत.

स्टॅण्ड अप कॉमेडीयन व अभिनेत्री विशाखा सुभेदार (Vishakha Subhedar) हिची बातच  न्यारी... विशाखा स्टेजवर आली रे आली की हास्याचे कारंजे फुटतात.  फु बाई फु,  कॉमेडीची बुलेट ट्रेन, महाराष्ट्राची हास्यजत्रा अशा एक ना अनेक शोमधून विशाखाने प्रेक्षकांना खळखळून हसवलं. अभिनय क्षेत्रात येण्याआधी लिपस्टिक, साड्या विकणारी विशाखा महाराष्ट्राचा सुपरस्टार या शोमध्ये झळकली आणि  तिच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळाली. यानंतर तिनं कधीच मागे वळून बघितलं नाही. हीच विशाखा उत्तम डान्सर आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? तिने शेअर केलेले व्हिडीओ हे सांगायला पुरेसे आहेत.

विशाखाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला भेट द्याल तर तिचे एकापेक्षा एक भारी डान्स व्हिडीओ पाहून तुम्ही अवाक् व्हाल. होय, अलीकडे विशाखाने ‘तमाशा लाईव्ह’मधील ‘तुझा रंग लागला’ या गाण्यावर थिरकतानाचा व्हिडीओ शेअर केला होता. तिच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही विशाखाच्या प्रेमात पडाल.

विशाखाचं डान्स टॅलेंज पाहायचं असेल तर हा व्हिडीओ तुम्ही नक्कीच बघायला हवा. तू तू हैं वहीं, दिल ने जिसे अपना कहां या गाण्यावरचा हा तिचा व्हिडीओ पाहून तुम्हीही वाह म्हणाल.

सून री सखी या गाण्यावरचा तिचा डान्स पाहूनही तुम्ही तिच्या प्रेमात पडाल. काही सेकंदाचा हा व्हिडीओतील तिचा नृत्याविष्कार अप्रतिम असाच आहे.

वनिता खरातसोबतचा हा तिचा डान्स व्हिडीओही एकदा पाहाच. साडी नेसून विशाखाने या व्हिडीओत जबरदस्त डान्स केला आहे.

ये वादा किया है, या गाण्यावरचा हा व्हिडीओ पाहा. या व्हिडीओतील तिचे हावभाव पाहून पुन्हा एकदा विशाखाच्या प्रेमात पडायला होतं.

 गेल्यावर्षी नवरात्रोत्सवात विशाखाने जोगवा हा नृत्यप्रकार सादर केला होता. यात तिच्या सोबतीला नृत्यदिग्दर्शिका लतिकाही होती. दोघींनी सादर केलेल्या या नृत्याविष्काराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा झाली होती.

झपाटलेला 2, मस्त चाललंय आमचं, येड्यांची जत्रा, अरे आवाज कोणाचा, सासूच स्वयंवर, दगडाबाईची चाळ, ये रे ये रे पैसा अशा अनेक चित्रपटात तिला संधी मिळाली.   विशाखाचे माहेरचे आडनाव शिंदे. ती मुळची ठाण्याची. 1998 साली अभिनेते आणि डबिंग आर्टिस्ट म्हणून प्रसिद्ध असलेले महेश सुभेदार यांच्यासोबत विशाखाने लग्नाच्या आणाभाका घेतल्या.  लग्नानंतर ती अंबरनाथला शिफ्ट झाली. विशेष म्हणजे लग्नानंतरच विशाखाला अभिनेत्री म्हणून ओळख प्राप्त झाली आहे.   

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेताटेलिव्हिजनसेलिब्रिटी