Join us  

Exclusive : मला एवढंच जमतं...! ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम ओंकार भोजने ‘मोजकं’ पण ‘मोलाचं’ बोलला!!

By रूपाली मुधोळकर | Published: March 15, 2022 4:06 PM

Onkar Bhojane : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या मंचावर वेगवेगळ्या स्किटमधील त्याचा बोलण्यातला साधेभोळेपणा, बोबडेपणा सगळ्यांनाच भावतो. आज आपल्या या लाडक्या ‘ओमी’चा हॅप्पीवाला बर्थ डे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ ( Maharashtrachi Hasya Jatra ) या कॉमेडी शोमधील सगळेच एकापेक्षा एक धुरंधर विनोदवीर. ‘कोकणचा कोहिनूर’ ओंकार भोजने (Onkar Bhojane) यापैकीच एक. हास्यजत्रेच्या मंचावर वेगवेगळ्या स्किटमधील त्याचा बोलण्यातला साधेभोळेपणा, बोबडेपणा सगळ्यांनाच भावतो. आज आपल्या या लाडक्या ‘ओमी’चा हॅप्पीवाला बर्थ डे.आज वाढदिवसानिमित्त ओंकारने ‘लोकमत फिल्मी’ला खास मुलाखत दिली. यावेळी ओंकार मोजकं पण मोलाचं बोलला. आज ओंकार ‘स्टार’ झाला. मात्र हे ‘स्टारपण’ तो अजिबात मिरवत नाही. 

आज तू सेलिब्रिटी झाला आहेस, आयुष्य  किती बदललं? असा प्रश्न केल्यावर ओंकार म्हणतो,‘ मी अजिबात बदलेला नाहीये. मी जसा होतो आजही अगदी तसाच आहे. मला जपणारी, मला प्रेरणा देणारी, माझ्यावर मनापासून प्रेम करणारी काही माणसं आहेत आणि या माझ्या आपल्या माणसांसाठी मी कायम जसा आहे तसाच असणार आहे.’

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शिवाय तुझा वेगळा काही अंदाज बघायला मिळणार का? सिनेमा वा मालिका येणार का? असं विचारलं असता ओंकारने अगदी प्रामाणिक उत्तर दिलं.  मला एवढंच जमतं आणि मी तेच करणार,... असं तो म्हणाला.

भविष्यात तेच ते करून एकवेळ कंटाळा आला तर...?  तेच ते करून एकवेळ कंटाळा आला तर काय करणार? असं विचारल्यावर तो म्हणाला, खूप गोष्टी करता येतील. मी लिहायला सुरूवात करेल. संगीतात आवड आहे, कदाचित ते करेल. पेन्टिंग करेल. अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातले मित्र आहेत, त्यांच्यासोबत काही वेगळं करेल.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रासोनी मराठीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार