Join us  

Video: हीच खरी दिवाळी! निखील बनेनी दाखवली चाळीतली 'एकोप्याची दिवाळी'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 12:01 PM

Nikhil bane: दारापुढे रांगोळी अन् दिव्यांची रोषणाई; निखील बनेनी दाखवली चाळीतली दिवाळी

महाराष्ट्राची हास्यजत्रा (maharashtrachi hasyajatra)  या लोकप्रिय कार्यक्रमातून नावारुपाला आलेला अभिनेता, विनोदवीर म्हणजे निखील बने (nikhil bane). एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या निखीलने त्याच्यातील साधेपणा आजही जपला आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध मिळाल्यानंतरही निखील आजही एका चाळीत राहतो. इतकंच नाही तर त्याचं त्याच्या घरावर आणि चाळ संस्कृतीवर विशेष प्रेम आहे. त्याचं हे प्रेम तो कायम त्याच्या पोस्टच्या माध्यमातून दाखवून देत असतो. यावेळीही त्याने त्याच्या चाळीतली दिवाळी कशी असते हे दाखवलं आहे.

निखील सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे तो कायम त्याच्या प्रोफेशनल लाइफसोबत पर्सनल आयुष्यातील किस्से, घडामोडी शेअर करत असतो. यात त्याने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात दिवाळीमध्ये चाळीतलं वातावरण किती उत्साहाचं, आनंदाचं असतं हे त्याने दाखवण्याचा प्रयत्न केलं आहे.

निखीलने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्याच्या चाळीत प्रत्येकाच्या दारापुढे दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. सोबतच प्रत्येक महिला दारापुढे छान रांगोळी काढत आहेत. चाळीतलं हे वातावरण पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात एकोप्याची भावना निर्माण होत आहे. त्यामुळे निखीलने या व्हिडीओला कॅप्शनही तसंच दिलं आहे.

“एकोप्याची दिवाळी…” असं कॅप्शन निखीलने या व्हिडीओला दिलं आहे. विशेष म्हणजे त्याचा हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनीही त्यावर कमेंटचा पाऊस पाडायला सुरुवात केली आहे. अनेकांना त्यांच्या चाळीतलं आनंदाचं, उत्साहाचं वातावरण भलतंच आवडलं आहे.

दरम्यान, निखील मुंबईतील भांडूप येथे राहतो. अलिकडेच त्याची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला बॉईज ४ हा सिनेमा रिलीज झाला.त्यामुळे सध्या तो या सिनेमामुळेही चर्चेत येत आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटींची दिवाळीमहाराष्ट्राची हास्य जत्रा