Join us
Daily Top 2Weekly Top 5

झी मराठी अवॉर्डमध्ये माधुरी दीक्षित आणि मलायका अरोराची मराठमोळी अदा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 17:10 IST

Malaika Arora And Madhuri Dixit : झी मराठी अवॉर्ड्स म्हणजेच नात्यांचा महाउत्सव आणि ह्या उत्सवात हजेरी लावली ती बॉलिवूडच्या तारका ‘मलायका अरोरा’ आणि धक धक गर्ल ‘माधुरी दीक्षित’ यांनी. माधुरी आणि मलायका ह्या दोघीही या घरच्या उत्सवात अगदी मराठमोळया अंदाजात सहभागी झाल्या.

झी मराठी अवॉर्ड्स म्हणजेच नात्यांचा महाउत्सव आणि ह्या उत्सवात हजेरी लावली ती बॉलिवूडच्या तारका ‘मलायका अरोरा’ आणि धक धक गर्ल ‘माधुरी दीक्षित’ यांनी. माधुरी आणि मलायका ह्या दोघीही या घरच्या उत्सवात अगदी मराठमोळया अंदाजात सहभागी झाल्या. त्यांच्या मराठमोळ्या अंदाजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

मलायका अरोराचे  कोळी नृत्य हे या कार्यक्रमाचं खास आकर्षण ठरलं. एवढेच नाही तर  श्रेया बुगडे कडून बेसनाचे लाडू बनवायला शिकून मलायका हे खास लाडू सारेगामा लिटिल चॅम्प्सचे परीक्षक सलील कुलकर्णींना देणार आहेत. शिवाय तिचं मराठीही ऐकायला मिळालं. ती सलील कुलकर्णीकडे पाहून मराठीत म्हणते, “फक्त लड्डू देणार, पण मी नाही येणार हं”. प्रोमो व्हिडीओ पाहून संपुर्ण सोहळा पाहण्यासाठी प्रेक्षक आतूर झाले आहेत.

 माधुरी दीक्षितनेही झी मराठीच्या सर्व नायिकांसोबत मंगळागौर साजरी केली. सोबत रंगली ती माधुरी, भाऊ कदम आणि भुवनेश्वरीची हास्याची जुगलबंदी. ह्या कार्यक्रमाच्या निवेदनाची धुरा सांभाळली ती म्हणजे आपल्या सर्वांची लाडकी जोडी अक्षरा आणि अधिपती यांनी. झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यासाठी कलाकार गेल्या बऱ्याच दिवसांपासून तयारी करत होते. हे सर्व धमाकेदार परफॉर्मन्स पाहण्याची प्रेक्षकांना नक्कीच उत्सुकता लागली असेल, तेव्हा शनिवार ४ नोव्हेंबर संध्याकाळी ७ वाजता हा पुरस्कार सोहळा पाहता येईल. 

टॅग्स :मलायका अरोरामाधुरी दिक्षित