Join us
Daily Top 2Weekly Top 5

"माझं मरण मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं...", 'लाखात एक आमचा दादा' फेम अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:53 IST

'लाखात एक आमचा दादा' मालिकेतून एका अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे. शालनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुमेधा दातार यांचा मालिकेतील प्रवास संपला आहे. 

'लाखात एक आमचा दादा' ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. मालिकेतील सर्वच पात्रांवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात. पण, 'लाखात एक आमचा दादा' मालिकेतून एका अभिनेत्रीने एक्झिट घेतली आहे. शालनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुमेधा दातार यांचा मालिकेतील प्रवास संपला आहे. 

'लाखात एक आमचा दादा' मालिकेत वेगळंच वळण आल्याचं पाहायला मिळत आहे. जालिंदर स्वत:चीच बायको शालनला दरीत ढकलून देतो. त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचं मालिकेत दाखवण्यात आलं आहे. शालनचा मृत्यू झाल्याने मालिकेतील सुमेधा दातार यांचा रोल आता संपला आहे. त्यामुळे त्यांना मालिकेतून एक्झिट घ्यावी लागली आहे. मालिकेतील शेवटच्या सीनचा BTS व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे. जालिंदर शालिनला दरीत ढकलताना सीन या व्हिडिओत दिसत आहे. 

"आपुले मरण पाहिले म्या डोळा, तो जाला सोहळा अनुपम्य...जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या या ओळी स्मरल्या. शालन च्या संपूर्ण प्रवासात ज्यांनी ज्यांनी साथ दिली, सहकार्य केलं, प्रेम आपुलकी दिली त्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद. शालन कथेत संपली असली तरी प्रेक्षकांच्या मनात कायम राहील...स्नेह आहेच. तो वृद्धिंगत व्हावा", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. शालनच्या मृत्यूनंतर आता मालिका कोणतं नवं वळण घेणार हे पाहणं रंजक असणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकार