Join us

"क्योंकी साँस..."; फेम अभिनेत्रीवर आली काम मागायची वेळ! सोशल मीडियावर व्हिडीओ केला शेअर, म्हणाली-

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 15:43 IST

'क्योंकी साँस भी कभी बहू थी' फेम अभिनेत्री बेरोजगार झाली असून तिच्यावर काम मागायची वेळ आली आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने काम मागितलं आहे

'क्योंकी साँस भी कभी बहू थी' मालिका टेलिव्हिजनवर चांगलीच गाजली. या मालिकेतील कलाकार पुढे चांगलेच लोकप्रिय झाले. इतकंच नव्हे मालिकेतील प्रमुख अभिनेत्री स्मृती इराणी थेट राजकारणात गेल्या. पण याच मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्रीवर काम मागायची वेळ आली आहे. ही अभिनेत्री म्हणजे अचिंत कौर. बॉलिवूड सिनेमांमध्ये झळकलेली आणि टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री अचिंत कौरने (achint kaur) सोशल मीडियावर काम देण्याचं आवाहन सर्वांना केलंय. 

अचिंत काय म्हणाली

अचिंत कौर यांनी व्हिडिओमध्ये अचिंत म्हणतात, “नमस्कार सर्वांना, मला आशा आहे की तुम्ही सर्वजण ठीक आहात. हा एक व्हिडिओ नाही, तर माझ्या हृदयातून आलेल्या भावना आहेत. मी एक अभिनेत्री आणि व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आहे. मला अनेक वर्षांचा अनुभव आहे. मी आपल्या देशात आणि परदेशात चांगल्या कामाच्या शोधात आहे. चित्रपट, शॉर्ट फिल्म्स, वेब सीरिज किंवा सोशल मीडिया कोलॅबोरेशन मी सर्व काही करण्यास तयार आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी कास्टिंग करत असेल, तर कृपया मला कळवा.” 

हा व्हिडीओ शेअर करत अचिंतने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “अभिनयाचं क्षेत्र अनेक चढ-उतारांनी भरलेले असते आणि मी पुढे काय येईल यासाठी तयार आहे. जर माझे काम तुमच्या दृष्टीकोनाशी जुळत असेल, तर तुम्हाला सहकार्य करण्यास मला आनंद होईल.” अचिंत कौरने 'जमाई 2.0' या वेब सीरिजमध्ये दुर्गा देवीच्या भूमिकेत अभिनय केला होता. अचिंतने प्रामाणिकपणे काम मागितल्याने अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. अचिंतने आमिर खानच्या 'दिल चाहता है' सिनेमातही अभिनय केला होता.

टॅग्स :टेलिव्हिजनबॉलिवूड