Join us

तुलसी Is Back! १७ वर्षांनी 'क्योंकी सास भी...'चा सीक्वल, स्मृती इराणीची पहिली झलक, 'या' दिवशी सुरू होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2025 09:47 IST

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi 2 Promo: 'क्योंकी सास भी कभी बहु थी' ही एकता कपूरची टेलिव्हिजनवरील सर्वात गाजलेली आणि लोकप्रिय ठरलेली मालिका. आता १७ वर्षांनी एकता कपूरने चाहत्यांना खास सरप्राइज दिलं आहे. या मालिकेचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

'क्योंकी सास भी कभी बहु थी' ही एकता कपूरची टेलिव्हिजनवरील सर्वात गाजलेली आणि लोकप्रिय ठरलेली मालिका. २००० साली सुरू झालेल्या या मालिकेने तब्बल ८ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. याच मालिकेतून तुलसीची भूमिका साकारून अभिनेत्री स्मृती इराणी घराघरात पोहोचली. आता १७ वर्षांनी एकता कपूरने चाहत्यांना खास सरप्राइज दिलं आहे. या मालिकेचा सीक्वल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 

गेल्या कित्येक दिवसांपासून 'क्योंकी सास भी कभी बहु थी'च्या सीक्वलची चर्चा होती. आता 'क्योंकी सास भी कभी बहु थी'ची पहिली झलक समोर आली आहे. पुन्हा एकदा तुलसीच्या भूमिकेतून स्मृती इराणी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. या मालिकेचा छोटा टीझर समोर आला असून लवकरच ही मालिका सुरू होणार आहे. याच महिन्यात 'क्योंकी सास भी कभी बहु थी' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आता फार वाट पाहावी लागणार नाहीये. 

स्टार प्लसवरुन 'क्योंकी सास भी कभी बहु थी'चा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये तुलसीच्या नव्या रुपात स्मृती इराणी दिसत आहेत. प्रोमोमध्ये घराचा दरवाजा उघडताना दिसत आहे. त्यानंतर अंगणातल्या तुळशीला तुलसी पाणी घालत आहे. "वेळ आली आहे तुम्हा सगळ्यांना परत भेटण्याची", असं या प्रोमोमध्ये तुलसी म्हणत आहे. २९ जुलैपासून रात्री १०.३० वाजता 'क्योंकी सास भी कभी बहु थी'चे नवीन एपिसोड चाहत्यांना पाहता येणार आहेत. 

टॅग्स :स्मृती इराणीटिव्ही कलाकारस्टार प्लसव्हायरल फोटोज्