Join us

"कुछ तो फिल हुआ था यार" निधनापूर्वी सुशांतला या प्रसिद्ध अभिनेत्याने केला होता मेसेज, व्यक्त केली होती चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 15:27 IST

अर्जुन बिजलानीनेच सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत मनातली खदखद दुर केली आहे.याचसोबत भावूक संदेशही त्याने लिहीला आहे.

सुशांतच्या आत्महत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे. सध्याच्या घडीला त्याच्या आठवणींव्यतिरिक्त आणखी काहीही मागे उरलेलं नाही. अशातच एक अभिनेता म्हणून ज्याप्रमाणं त्याची आठवण काढली जात आहे, तसंच परखडपणे आपली मतं मांडणारा एक दिलखुलास व्यक्ती म्हणूनही सुशांत अनेकांच्या स्मरणात आहे. टीव्ही अभिनेता अर्जुन बिजलानीनेही सुशांतबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे. अर्जुनने सांगितले की, सुशांतला मी मेसेज केला, तेव्हा मला खूप चिंता वाटत होती. सुशांतबरोबर काही बरे वाईट तर होत नाही ना अशा भीतीमध्ये मी त्याला मेसेज केला होता. 

मेसेजमध्ये आशा करतो सगळं काही ठिक असेल असा मेसेज त्याने आपला मित्र सुशांतला केला होता. आणि नेमका हाच मेसेज शेवटचा ठरला. खुद्द अर्जुनेच सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत मनातली खदखद दुर केली आहे. स्क्रीनशॉट शेअर करत अगदी भावूक संदेशही त्याने लिहीला आहे. तुझ्यासाठी RIP म्हणणार नाही, जसं मी नेहमी म्हणायचो, आजही तेच म्हणेन काळजी घे. 

तसेच सुशांत आणि अर्जुन दोघेही एकत्र एन्जॉय करत असल्याचा एक फोटोही अर्जुनने शेअर केला आहे. फोटोंवरून दोघांमध्येही चांगली मैत्री असल्याचे दिसते. इतके मित्र असूनही सुशांत एकटाच का होता? खरंच कॅमे-या समोर हसणारे चेहरे त्यांच्या ख-या आयुष्यात इतके दुःखी असतात. याच प्रश्नाने आज सा-यांच्या मनात काहुर माजला आहे. 

सुशांतच्या मानसिक स्थितीपासून त्याला नेमकी अशी कोणत्या गोष्टीची भीती सतावत होती की इतक्या मोठ्या निर्णयापर्यंत त्याला पोहोचावं लागलं असेच प्रश्न त्याला जाणणाऱ्या प्रत्येकाच्या मनात घर करु लागले आहेत. 

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत