Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रांती रेडकर आणि अमितराज संगीत सम्राटाच्या मंचावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 10:59 IST

नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या  टीम्स आणि त्यांचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे कार्यक्रमात रंगत आणत आहेत.

संगीत सम्राट पर्व दुसरे मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील होतकरू गायक आणि संगीतकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी हक्काचं व्यासपीठ 'संगीत सम्राट पर्व २' ने उपलब्ध करून दिले आहे. दुसऱ्या पर्वाला देखील प्रेक्षकांचे प्रेमआणि उदंड प्रतिसाद लाभत आहे. या कार्यक्रमाच्या रूपरेषेत बदल प्रेक्षक अनुभवत आहेत. नादमधुर सह्याद्री, स्वरमय कोकण, सूरसाज विदर्भ आणि लयदार मराठवाडा या  टीम्स आणि त्यांचे कॅप्टन्स सावनी रवींद्र, जुईली जोगळेकर, राहुल सक्सेना आणि अभिजीत कोसंबी हे कार्यक्रमात रंगत आणत आहेत.या आठवड्यात संगीत सम्राटच्या मंचावर पहिल्या पर्वाची परीक्षक क्रांती रेडकर आणि संगीतकार अमितराज सज्ज होणार आहेत.

 

नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने या आठवड्यात कोळी गीतांची मैफिल रंगणार आहे. सर्व स्पर्धक या कोळी गीत सादर करून नारळी पौर्णिमा साजरी केली. क्रांती रेडकर सर्व स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस एन्जॉय करताना दिसणार आहे.गुरुवारी प्रसारित होणाऱ्या एपिसोडमध्ये सुप्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी हजेरी लावली. 

 

रक्षाबंधन हा सणदेखील जवळ आला आहे.'संगीत सम्राट पर्व २'च्या मंचावर देखील हा भावा बहिणीच्या नात्याचा उत्सव सूत्रसंचालकप्रियांका बर्वे आणि परीक्षक राहुल देशपांडे यांनी साजरा केला.प्रियंकाने राहुल यांना राखी बांधली. राहुल यांनी प्रियंकाला तिच्या संगीत क्षेत्रातील कारकिर्दीत वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि तिला नेहमीच पाठिंबा दिला म्हणूनप्रियंकाला राहुलच्या रूपात एक मोठा भाऊच भेटला असं ती म्हणाली.तसेच या आठवड्यात काही नवीन चेहरे संगीत सम्राट पर्व २च्या मंचावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. हे चेहरे कोण असणार आहेत हे प्रेक्षकांना लवकरच कळेल.