Join us

'हे' लोकप्रिय कपल लवकरच देणार गुड न्यूज, बघा त्यांचे मोहून टाकणारे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 12:27 IST

'भाभी', 'कुसम' आणि 'गंगा' सारख्या मालिकेत तिने काम केले आहे. ऋचा गुजरातीने व्यावसायिक विशाल जायसवालसह 12 डिसेंबर 2016 मध्ये लग्न करत आयुष्याची नवीन सुरूवात केली होती.

टीव्ही अभिनेत्री ऋचा गुजराती सध्या आपल्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत आहे.  त्यामुळेच त्यांच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. काही दिवसांपूर्वी ऋचाने आपल्या लग्नाचे फोटो शेअर केले होते. आता ऋचा सोशल मीडियावर बेबी बंप फ्लॉन्ट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

ऋचाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 'भाभी', 'कुसम' आणि 'गंगा' सारख्या मालिकेत तिने काम केले आहे. ऋचाने व्यावसायिक विशाल जायसवालसह  12 डिसेंबर 2016 मध्ये लग्न करत आयुष्याची नवीन सुरूवात केली होती. 

हे कपल आता आपल्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. त्यांच्या आनंदाला उधान आलंय. त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचे आगमन होणार या गोष्टीचा आनंदच या कपलच्या चेह-यावर पाहायला मिळतो. ऋचाने हा आनंद साजरा करण्यासाठी खास मॅटर्निटी फोटोशूटही केले आहे. यातले काही खास फोटो त्यांनी चाहत्यांसह शेअर केले आहेत.

ऋचाचे हे दुसरे लग्न आहे. पहिले लग्न तिने 2010मध्ये  मितुल संघवीसह केले होते. पण लग्नानंतर काही ना काही कारणामुळे दोघांचे नाते फारकाळ काही टिकले नाही.  2013 मध्येच या दोघांनी घटस्फोट घेत वेगळे झाले.