Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी 2'च्‍या घरात किशोरी शहाणे न चुकता करतात ही गोष्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2019 07:00 IST

किशोरी शहाणे रसिकांमध्ये आणि त्या घरातील स्पर्धकांमध्ये आपली जादू पसरवत आहेत.

ठळक मुद्देकिशोरी शहाणे दिगंबर नाईक आणि अभिजीत बिचुकलेला प्राणायाम शिकवताना दिसणार आहेत. 

'बिग बॉस मराठी'च्‍या घरामध्‍ये प्रवेश केल्‍यापासून किशोरी शहाणे रसिकांमध्ये आणि त्या घरातील स्पर्धकांमध्ये आपली जादू पसरवत आहेत. त्या त्यांच्या फिटनेसच्या बाबतीत अतिशय सतर्क आहेत. त्यामुळे 'बिग बॉस मराठी'मध्‍ये देखील त्या न चुकता योगा करताना दिसतात. वूटच्‍या 'अनसीन अनदेखा'च्‍या नवीन क्लिपमध्‍ये ५१ वर्षीय अभिनेत्री दिगंबर नाईक आणि अभिजीत बिचुकलेला प्राणायाम शिकवताना दिसणार आहेत. 

बिग बॉस मराठीच्या घरात दिगंबर आणि बिचुकले गार्डनमध्‍ये गप्‍पा मारत असतानाच किशोरी शहाणे योगासने करत असल्याचे त्या दोघांना दिसणार आहे. त्यावर दिगंबर त्यांना मस्करीत बोलणार आहे की, ''बाहेर सोडायचं ना ते..?'' त्यावर  किशोरी शहाणे लगेचच त्‍याच्‍याजवळ बसून त्‍याला योगासनांविषयी माहिती देणार आहेत आणि एवढेच नव्हे तर त्यांना योगासने शिकवणार आहेत. त्या दिगंबर आणि बिचुकले यांना म्हणणार आहेत की, ''श्‍वास अशाप्रकारे बाहेर सोडायचा असतो... आपण करूया का ही योगासने?'' 

किशोरी शहाणे यांचे हे बोलणे ऐकल्यावर दिगंबरला योगासनांचा सराव करताना चुकचुकल्यासारखे वाटणार आहे. तसेच त्याची पत्नी देखील योगा करते. पण त्याला ही गोष्ट आवड नसल्‍याचे किशोरी शहाणे यांना तो सांगणार आहे. पण शेवटी किशोरी शहाणे त्याला योगासनं करण्‍यासाठी तयार करणार आहेत. किशोरी आणि दिगंबर योगासनं करत असताना किशोरी बिचुकलेला देखील त्‍यांच्‍यात सामील होण्‍यास सांगणार आहेत. किशोरी बिचुकलेला म्हणणार आहेत की, ''हे तुम्‍ही करू शकता, पाय दुखत असतील तरी.'' हे ऐकताच झोपाळ्यावर झोके घेत असलेला बिचुकले देखील उठून त्यांच्यासोबत योगा करणार आहे. त्यामुळे आता बिग बॉस मराठी 2 च्या घरात दिगंबर आणि बिचुकले यांना फिटनेस कोच मिळाला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. 

किशोरी शहाणे यांना बिग बॉस मराठीच्या घरात विविध अनुभव येत आहेत. चोर बाजार या टास्क दरम्यान किशोरी शहाणे आणि शिवानी सुर्वे मध्ये चांगला वाद रंगला. या भांडणात त्यांनी शिवानीला सायको असे देखील म्हटले... त्यावर शिवानीने देखील उत्तर दिले होते की, “किशोरी शहाणे असतील त्या त्यांच्या घरी, माझ्यासमोर आवाज नाही करायचा.”

टॅग्स :बिग बॉस मराठीकिशोरी शहाणेअभिजीत बिचुकलेदिगंबर नाईक