Join us  

गश्मीर महाजनी ते कृष्णा श्रॉफ; Khatron Ke Khiladi 14 साठी 13 स्पर्धकांची नाव झाली लॉक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 1:59 PM

Khatron Ke Khiladi 14: या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या कलाकारांच्या नावाची यादी नुकतीच समोर आली आहे.

छोट्या पडद्यावर विशेष लोकप्रिय असलेला कार्यक्रम म्हणजे खतरों के खिलाडी (Khatron Ke Khiladi). रोहित शेट्टी होस्ट करत असलेल्या या रिअॅलिटी शोचे आतापर्यंत १३ पर्व झाले असून लवकरच १४ वं (Khatron Ke Khiladi 14) पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या या शोची नेटकऱ्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. यात खासकरुन या नव्या पर्वात कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. या नुकतीच १३ जणांचा नाव फायनल झाली असून स्पर्धकांची फायनल लिस्ट समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर Khatron Ke Khiladi 14 ची जोरदार चर्चा आहे. यात अनेक कलाकारांची नाव चर्चिली जात होती. परंतु, आता यंदाच्या पर्वातील फायनल १३ स्पर्धकांची नाव समोर आली आहेत. या स्पर्धकांमध्ये काही लोकप्रिय कलाकार आणि मराठी कलाकारांचाही समावेश आहे.

Khatron Ke Khiladi 14 फायनलिस्ट

सुमोना चक्रवर्ती, शिल्पा शिंदे, गश्मीर महाजनी, आशीष मेहरोत्रा, निमृत कौर अहलुवालिया, शालीन भनोत, अभिषेक कुमार, समर्थ जुरेल, नियती फतनानी, करणवीर मेहरा, आदिती शर्मा, आसिम रियाज  आणि कृष्णा श्रॉफ या कलाकारांचा समावेश आहे. 

टॅग्स :खतरों के खिलाडीटेलिव्हिजनटिव्ही कलाकारगश्मिर महाजनीरोहित शेट्टी