Join us
Daily Top 2Weekly Top 5

KBC 12: 'या' स्पर्धकाला कियारासोबत करायचंय लग्न, १ कोटीच्या प्रश्नाचं तिचा फोटो पाहून देणार उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 11:31 IST

मेकर्सने येणाऱ्या एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. ज्यात एक स्पर्धक हॉटसीटवर बसला आहे आणि तो ५० लाख रूपये जिंकला असून १ कोटी रूपयांचा प्रश्न खेळणार आहे.

कौन बनेगा करोडपती १२ मध्ये आतापर्यंत ३ करोडपती विनर मिळाले आहेत आणि कदाचित आणखी एक स्पर्धक १ कोटी रूपये जिंकणार आहे. मेकर्सने येणाऱ्या एपिसोडचा प्रोमो रिलीज केला आहे. ज्यात एक स्पर्धक हॉटसीटवर बसला आहे आणि तो ५० लाख रूपये जिंकला असून १ कोटी रूपयांचा प्रश्न खेळणार आहे.

हा स्पर्धक कुरिअर बॉय म्हणून काम करतो आणि त्याचं नाव  विजय पाल सिंह असं आहे. प्रोमोत अमिताभ बच्चन विजयचा परिचय करून देतात. आणि त्याला विचारतात की, तुम्ही कियारा अडवाणीचे फॅन आहात का. यावर विजय असं उत्तर देतो की, नाही सर, मला तर त्यांच्यासोबत लग्न करायचं आहे. प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही'. हे ऐकून अमिताभ बच्चन अवाक् होतात. (KBC चा सलाम : अपघातात गमावले पाय तरी 'तिने' जिद्दीने सर केला माउंट एव्हरेस्ट....)

प्रोमोमध्ये पुढे सांगण्यात आले आहे की, विजय पाल सिंहने ५० लाख रूपये जिंकले आहेत आणि आता त्याला १ कोटी रूपयांचा प्रश्न विचारला जाणार आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी विजय खिशातून कियारा अडवाणीचा फोटो काढतो आणि तिला लकी मॅस्कॉट असल्याचं सांगतो.

प्रोमोमध्ये विजयचं घरही दाखवण्यात आलं आहे. इथे आपल्या रूममध्ये विजय पालने कियारा अडवाणी अनेक फोटो लावले आहेत. दरम्यान कौन बनेगा करोडपतीच्या या सीझनबाबत सांगायचं तर आतापर्यंत नाझिया नसीम, आयपीएस मोहिता शर्मा आणि अनुपा पास यांनी १-१ कोटी रूपये जिंकले आहेत. आता विजय १ कोटी जिंकतो का हे बघावं लागेल. 

टॅग्स :कौन बनेगा करोडपतीटेलिव्हिजनकियारा अडवाणीबॉलिवूड