Join us  

करण कुंद्रा अन् तेजस्वी प्रकाशचा बाथटबमधील फोटो लीक; सोशल मीडियावर होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 5:02 PM

Karan kundrra -tejasswi prakash: या फोटोमध्ये दोघंही बाथटबमध्ये बसले असून करणच्या हातात एक बाटली दिसून येत आहे.

सध्या छोट्या पडद्यावरील तेजस्वी प्रकाश (Tejasswi Prakash) आणि करण कुंद्रा (Karan Kundrra) ही जोडी सातत्याने चर्चेत येत आहे. 'बिग बॉस १५' (bigg boss 15) च्या निमित्ताने भेटलेली ही जोडी एकमेकांना डेट करत असून हा शो संपल्यानंतरही त्यांचं नात कायम आहे. त्यामुळे सोशल मीडियावर ते कायम चर्चेत असतात. यात सध्या या दोघांचा एक रोमॅण्टिक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये ते बाथटबमध्ये बसल्याचं दिसून येत आहे.

कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असलेले करण-तेजस्वी अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. मात्र, यावेळी त्यांचा एक अत्यंत खास फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघंही बाथटबमध्ये बसून रोमॅण्टिक अंदाजात दिसून येत आहेत.

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला फोटो करणने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघंही बाथटबमध्ये बसले असून करणच्या हातात एक बाटली दिसून येत आहे. या दोघांचा हा फोटो निखिल नामक फोटोग्राफने काढल्याचं दिसून येत आहे. कारण, करणने या पोस्टमध्ये त्याला टॅग केलं आहे.

टॅग्स :तेजस्वी प्रकाशकरण कुंद्राटेलिव्हिजनबिग बॉस