Join us

​करण ग्रोव्हर करणार द ड्रामा कंपनीचे सूत्रसंचालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 12:06 IST

द ड्रामा कंपनी हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात कृष्णा अभिषेक, अली ...

द ड्रामा कंपनी हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून या कार्यक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रमात कृष्णा अभिषेक, अली असगर, संकेत भोसले, सुगंधा मिश्रा यांसारखे कॉमेडीतील दिग्गज कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. या सगळ्या कलाकारांची एक छान भट्टी जमून आली आहे. आता या कार्यक्रमात एक नवीन एंट्री होणार आहे. करण ग्रोव्हर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार असून त्याने या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील केली आहे. करणने सारथी, मेरी आवाज को मिल गयी रोशनी यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. आता तो ड्रामा कंपनीमध्ये शंभुदादा म्हणजेच मिथुन चक्रवर्तींसोबत काम करणार आहे. चित्रीकरणादरम्यान मिथुन यांनी करणच्या अभिनयाची प्रचंड प्रशंसा केली असल्याने करण सध्या खूप खूश आहे. त्याचे विनोदाचे टायमिंगदेखील अफलातून असल्याचे देखील मिथुन चक्रवर्ती यांनी म्हटले आहे. करण हा छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय अभिनेता असल्याने त्याचा या कार्यक्रमासाठी विचार करण्यात आला असल्याचे सांगितले जात आहे. द ड्रामा कंपनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्याआधी करणने अनेक पुरस्कार सोहळ्यांचे सूत्रसंचालन केले आहे. त्यामुळे त्याला सूत्रसंचालनाची आणि लोकांनी हसवण्याची कला चांगलीच अवगत आहे.द ड्रामा कंपनी या कार्यक्रमासाठी छोट्या पडद्यावरच्या अनेक प्रसिद्ध कलाकारांचा विचार करण्यात आला होता. पण करणच यासाठी योग्य असल्याचे या मालिकेच्या टीमचे एकमत झाल्याने करणची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली. याविषयी करण ग्रोव्हर सांगतो, द ड्रामा कंपनी या शोचा एक भाग होताना मला आनंद होत आहे. या कार्यक्रमाची टीम खूपच मस्त आहे. त्यांच्यासोबत काम करताना खूप मजा येत आहे. त्यांच्यासोबत माझे खूपच चांगले ट्युनिंग जमले आहे. मिथुन दा तर मला या कार्यक्रमासाठी खूपच मदत करत आहेत. करण नुकताच बहू हमारी रजनी_कांत या कार्यक्रमात झळकला होता. Also Read : सैराट चित्रपटातील हा कलाकार काम करणार कृष्णा अभिषेकसोबत द ड्रामा कंपनीमध्ये