Join us
Daily Top 2Weekly Top 5

​द कपिल शर्मा शोवर शक्ती कपूरच्या फॅन्सनी व्यक्त केली ही इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2017 16:42 IST

द कपिल शर्मा शोमध्ये नेहमीच प्रेक्षकांना भन्नाट किस्से पाहायला मिळतात. या कार्यक्रमातील विनोदामुळे प्रेक्षक खळखळून हसतात यात काही शंकाच ...

द कपिल शर्मा शोमध्ये नेहमीच प्रेक्षकांना भन्नाट किस्से पाहायला मिळतात. या कार्यक्रमातील विनोदामुळे प्रेक्षक खळखळून हसतात यात काही शंकाच नाही. या कार्यक्रमाच्या सेटवर नेहमीच सेलिब्रेटी हजेरी लावत असतात. हे सेलिब्रेटी तिथे उपस्थित असलेल्या त्यांच्या फॅन्ससोबत गप्पा गोष्टी मारतात. त्यांच्यासोबत नाचतात, गातात. त्यांच्या फॅन्सच्या इच्छादेखील ते पूर्ण करतात.द कपिल शर्मा शोच्या सेटवर नुकतीच शक्ती कपूरने हजेरी लावली होती. शक्ती कपूर हे त्यांनी साकारलेल्या नकारात्मक भूमिकांसाठी तो ओळखला जातो. शक्तीला या कार्यक्रमाच्या सेटवर आल्यानंतर खूपच चांगले सरप्राईज मिळाले. शक्ती हा खलनायक म्हणून प्रसिद्ध असला तरी या कार्यक्रमाच्या सेटवर आलेल्या महिलांनी त्याला राखी बांधण्याची इच्छा व्यक्त केली. खरे तर ही एक आगळीवेगळी इच्छा असल्याने शक्ती कपूर ती पूर्ण करेल की नाही हा सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण त्याने ही इच्छा लगेचच पूर्णदेखील केली. शक्ती कपूरने नकारात्मक भूमिकांसोबत विनोदी भूमिकादेखील साकारल्या आहेत. प्रेक्षकांनी त्याच्या नकारात्मक भूमिकांसोबतच त्याच्या विनोदी भूमिकांचेदेखील कौतुक केले आहे. पण शक्ती कपूरची खरी ओळख ही बॉलिवूडमधील खलनायक अशीच आहे. या खलनायकाला राखी बांधण्याची इच्छा उपस्थित स्त्रियांनी व्यक्त केल्यानंतर खरे तर द कपिल शर्मा शोच्या सगळ्याच टीमला चांगलाच धक्का बसला होता. पण ही विनंती ऐकल्यानंतर या शोच्या टीमने लगेचच राख्यांची व्यवस्था केली आणि महिलांना स्टेजवर बोलवून त्यांची ही इच्छा पूर्ण केली. शक्ती कपूरनेदेखील हे सगळे खूप एन्जॉय केले. शक्तीने आपली इच्छा पूर्ण केल्यामुळे त्याच्या महिला चाहत्यांना खूपच आनंद झाला होता.