कपिलसाठी याप्रकारचा विवाद काही नाही नवा नाही. नेहमीच कोणत्याना कोणत्या कारणाला घेऊन तो वादात असतोच. गतवर्षी सुनील ग्रोव्हर सोबत केलेल्या वादामुळे कपिल शर्मा वादात अडकला होता. यानंतर अनेक कलाकारांना कपिलने सेटवर वाट पाहायला लावली आणि शूटिंग केल्याशिवायच या कलाकारांना परतावे लागले. त्याच दरम्यान कपिल डिप्रेशनमध्ये सुद्धा गेल्या होता.
कपिलच्या फॅमिली टाईम विद कपिल शर्मा या शोच्या दुसऱ्या एपिसोडसाठी टायगर श्रॉफ शूट करणार होता. पण हे शूट कपिलने ऐनवेळी रद्द केले अशा बातम्या मीडियात आल्या होत्या. याआधी देखील द कपिल शर्मा शो या कार्यक्रमाच्या चित्रीकरणाच्यावेळी कपिलची तब्येत वारंवार बिघडायला लागली होती. त्यामुळे अनेक सेलिब्रेटींना कपिलच्या सेटवर येऊन शूटिंग न करताच परतावे लागले होते. याही वेळी नेमका हाच कित्ता गिरवला जात असल्याचे म्हटले जात होते.
Some people just want to defame you for few bucks but it will take ages to make a stand against the wrong.. I shall do it today n forever.. pic.twitter.com/Vg8bJoWwhF— KAPIL (@KapilSharmaK9) April 7, 2018