Shefali Jari wala Death: 'कांटा लगा गर्ल' तथा अभिनेत्री, मॉडेल शेफाली जरीवाला हिचे वयाच्या ४२ व्या वर्षी अचानक निधन झाले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार तिला हृदयविकाराचा झटका आला. तिची प्रकृती खालावल्यानंतर, तिचे पती पराग त्यागी यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन विश्वात आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. तिचा मृतदेह मुंबई येथील कूपर रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवल्याचेही समजते.
शेफाली जरीवालाने आपला अप्रतिम अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली होती. २००२ मध्ये तिचे 'कांटा लगा' गाणे प्रसिद्ध झाले होते. या गाण्यातील तिच्या डान्सने, तिला रातोरात प्रसिद्धी मिळाली. याशिवाय, तिने अनेक टीव्ही सीसियल्स आणि अनेक प्रोजेक्ट्समध्येही काम केले होते. यासाठीही तिचे बरेच कौतुक झाले.
2002 मध्ये रिलीज झालेल्या 'कांटा लगा' गाण्याने मिळाली होती प्रसिद्धी -'कांटा लगा' गाणे रिलीज होताच शेफाली देशाच्या काण्याकोपऱ्यात पोहोचली होती. हे गाणे 2002 मध्ये रिलीज झाले होते. खरे तर हे गाणे म्हणजे, 1964 सालच्या 'समझौता' या सिनेमातील प्रसिद्ध गाणे 'कांटा लगा'चे रीक्रिएटेड व्हर्जन होते. हे गाणे लता मंगेशकर यांनी गायले होते. तर कल्याणजी-आनंदजी यांनी संगितबद्ध केले होते.
अहमदाबादेत जन्म, वेब सीरीजमध्येही केले काम - शेफालीचा जन्म 15 डिसेंबर 1982 रोजी अहमदाबादमध्ये झाला होता. ती अनेक म्युझिक व्हिडिओज, रिअॅलिटी शोज आणि चित्रपटांतही दिसून आली आहे. ती 'नच बलिए 5' आणि 'नच बलिए 7' चाही भाग होती. ती 2019 मध्ये सलमान खानचा प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'बिग बॉस 13' मध्येही दिसली होती. याशिवाय तिने 2018 मध्ये 'बेबी कम ऑन' वेब सीरीजमध्येही मुख्य भूमिकेत दिसली होती. यात तिच्या सोबत श्रेयस तळपदे होता.