Join us
Daily Top 2Weekly Top 5

"२०२५ ने प्रत्येक पातळीवर कसोटी पाहिली, प्रिय २०२६ कृपया..." जुई गडकरीची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 11:06 IST

 जुईनं २०२५ या वर्षाला निरोप देत आणि २०२६ चे स्वागत करत एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.

जुई गडकरी मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे.  सध्या 'ठरलं तर मग' या लोकप्रिय मालिकेत सायलीची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर ती राज्य करतेय. जुई गडकरीचा चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात आहे. सोशल मीडियावर ती सक्रीय असते. आता जुईनं २०२५ या वर्षाला निरोप देत आणि २०२६ चे स्वागत करत एक अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे.

जुई गडकरीनं सोशल मीडियावर २०२५ मधील काही खास फोटो शेअर केले आहेत. ज्यात कुटुंब, २०२५ वर्षात मिळालेले अवॉर्ड्स, अभिनेता प्रसाद लिमयेसोबतचं शुटिंग आणि काही खास क्षणांची झलक दिसत आहे. जुईनं आपल्या पोस्टमध्ये २०२५ सालातील संघर्षावर भाष्य करताना लिहिले, "२०२५ ने माझी प्रत्येक क्षणाला खूप परीक्षा घेतली. मी माझं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. काही वेळा मी अयशस्वी झाले. पण, मी खूप प्रयत्न केला. २०२५ कठीण होतं.  हो... नक्कीच होतं आणि ते एक मोठा धडा देऊन गेलं".

कठीण काळात साथ निभावलेल्याप्रती जुईनं कृतज्ञता व्यक्त केली आहे. ती पुढे म्हणते, "या सगळ्या कठीण काळात मला माझ्या आधारस्तंभांची आठवण झाली". नवीन वर्षाचे स्वागत करताना जुईने २०२६ कडे एक विनंती केली आहे. तिने लिहिले, "प्रिय २०२६, प्रत्येक अर्थाने... कृपया कृपया दयाळू राहा". जुईच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रेटींनीही प्रेमाचा वर्षाव केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Jui Gadkari's emotional post: 2025 tested, 2026 be kind.

Web Summary : Actress Jui Gadkari bids farewell to a challenging 2025, sharing heartfelt reflections on struggles and gratitude. She welcomes 2026 with a plea for kindness, receiving supportive responses from fans and celebrities alike.
टॅग्स :जुई गडकरी