Join us  

Jhalak Dikhla Ja 11मध्ये भारतीय क्रिकेटपटूच्या पत्नीची वाइल्ड कार्ड एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 11:59 AM

मराठमोळ्या शिव ठाकरे 'झलक दिखला जा'मध्ये सहभागी झाल्याने हा शो चर्चेत आहे. आता या शोमध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरच्या पत्नीची एन्ट्री होणार आहे.

'झलक दिखला जा' हा टीव्हीवरील लोकप्रिय रिएलिटी शो आहे. सध्या 'झलक दिखला जा' शोचा ११वा सीझन सुरू आहे. मराठमोळ्या शिव ठाकरे 'झलक दिखला जा'मध्ये सहभागी झाल्याने हा शो चर्चेत आहे. आता या शोमध्ये प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरच्या पत्नीची एन्ट्री होणार आहे. भारताचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा 'झलक दिखला जा' ११मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार आहे. 

'झलक दिखला जा ११' या डान्स रिएलिटी शोमध्ये लवकरच वाइल्ड कार्ड एन्ट्रीने काही स्पर्धक सहभाग घेणर आहेत. यामध्ये कोरिओग्राफर धनश्री वर्माचंही नाव असल्याची माहिती शोच्या खात्रीशीर सूत्राने दिली आहे.  धनश्रीबरोबरच सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि डान्सर निकिता गांधीदेखील या शोमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री घेणार असल्याची चर्चा आहे. तर 'बिग बॉस ओटीटी २' फेम मनीषा राणीचंही नाव चर्चेत आहे. झलक दिखला जामध्ये धनश्री वर्माची एन्ट्री होणार असल्याने तिचे चाहते उत्सुक आहेत. पण, धनश्री अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. 

धनश्री ही पेशाने डेंटिस्ट आहे. ती कोरिओग्राफरही आहे. धनश्रीला डान्सची आवड असून तिचे अनेक रील व्हि़डिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. धनश्रीने २०२०मध्ये क्रिकेटर यजुवेंद्र चहलशी लग्नगाठ बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केली. ती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

टॅग्स :युजवेंद्र चहलसेलिब्रिटीऑफ द फिल्ड