Join us
Daily Top 2Weekly Top 5

जान्हवीने आर्यावर हात उचलला? घरातलं वातावरण तापलं! बिग बॉसच्या घरात हाय वोल्टेज ड्रामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2024 08:54 IST

जान्हवी - आर्याने घेतला एकमेकांशी पंगा, बिग बॉसचा नवा प्रोमो पाहून सर्वांच्या भुवया उंचावल्या (bigg boss marathi 5)

बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची सध्या चांगलीच चर्चा आहे. पहिल्याच आठवड्यात घरात वाद, शाब्दिक चकमक आणि राडे दिसून आले. बिग बॉसच्या घरात अलीकडेच नॉमिनेशनची तोफ हे कार्य पार पडलं. या कार्यात सदस्यांमध्ये भांडणं झालीच. शिवाय घरात दोन मुख्य गट पडलेले दिसून आले. बिग बॉसच्या घरात आज मात्र हाय वोल्टेज ड्रामा रंगणार आहे. जान्हवी आणि आर्यामध्ये खडाजंगी होणार असून जान्हवीने आर्यावर हात उचललेला दिसतोय. 

जान्हवीने आर्याला मारलं?

'बिग बॉस मराठी'चा नवा धमाकेदार प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोमध्ये जान्हवी आणि आर्या एकमेकींसोबत नडताना दिसून येत आहे. जान्हवी-आर्यामध्ये धक्काबुक्की झालेलीदेखील पाहायला मिळत आहे. दरम्यान जान्हवी म्हणते,"नॉमिनेशनदरम्यान आर्या किती फडफड करत होती". त्यावर आर्या म्हणते,"माझ्यामध्ये तुम्ही आता येऊ नका". तर जान्हवी आर्याला म्हणते,"किती दिवस 'बिग बॉस मराठी'च्या घरात राहतेस ना तेच बघते मी". पुढे आर्या जान्हवीला "व्हिलन" म्हणाली.

जान्हवी-आर्यामध्ये पंगा, घरात दंगा

आर्याने व्हिलन म्हणताच जान्हवी तिच्यावर धावून गेली. दोघींनी हाताने एकमेकांना मारल्याचंही प्रोमोत बघायला मिळतं. दोघींमध्ये खडाजंगी होताच घरातले इतर सदस्यही त्यांना सावरायला पुढे आले. आर्या आणि जान्हवीचा प्रोमोमधील पंगा पाहून 'बिग बॉस मराठी'च्या आजच्या भागात काय घडतंय हे बघण्याची प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच वाढली आहे. याशिवाय उद्या "वीकेंड का वार" मध्ये रितेश देशमुख सर्वांची शाळा कशी घेणार याचीही उत्सुकता आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठीमराठीमराठी अभिनेतारितेश देशमुख