Join us
Daily Top 2Weekly Top 5

जॅकलिन थिरकली माधुरीच्या गाण्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2016 16:43 IST

झलक दिखला जा या कार्यक्रमात जॅकलिन फर्नांडिस सध्या परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमात काही सिझन्स माधुरी दिक्षितने परीक्षणाची ...

झलक दिखला जा या कार्यक्रमात जॅकलिन फर्नांडिस सध्या परीक्षकाची भूमिका साकारत आहे. या कार्यक्रमात काही सिझन्स माधुरी दिक्षितने परीक्षणाची जबाबदारी सांभाळली होती. आजही माधुरीला तिचे फॅन्स मिस करतात. जॅकलिन या कार्यक्रमात अाल्यापासून तिनेदेखील प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिची परीक्षणाची स्टाईल सगळ्यांनाच आवडत आहे. जॅकलिनने नुकतीच तिच्या परफॉर्मन्समधून माधुरीची सगळ्यांना आठवण करून दिली. माधुरीच्या चोली के पिछे क्या है या गाण्यावर ती थिरकली. यावेळी सूत्रसंचालक मनिष पॉलनेही तिला साथ दिली.