Join us

लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 09:32 IST

लग्नानंतर ३ वर्षांतच पायल घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा आहे. अभिनेत्रीची एक पोस्ट आणि पतीच्या कंपनीतील नोकरीला रामराम केल्यामुळे तिच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

टीव्ही अभिनेत्री पायल रोहतगी तिच्या पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. पायलच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आल्याचं म्हटलं जात आहे. लग्नानंतर ३ वर्षांतच पायल घटस्फोटाच्या उंबरठ्यावर असल्याच्या चर्चा आहे. अभिनेत्रीची एक पोस्ट आणि पतीच्या कंपनीतील नोकरीला रामराम केल्यामुळे तिच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

पायल रोहतगी हिने कुस्तीपटू आणि अभिनेता असलेल्या संग्राम सिंहसोबत संसार थाटला होता. पण, लग्नानंतर ३ वर्षांनीच आता त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. पायलने संग्रामच्या कंपनीतील नोकरीचा राजीनामा दिला आहे. याचा फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर करत पोस्ट लिहिली आहे. "मी काही वैयक्तिक कारणांमुळे संग्राम सिंग चॅरिटेबल फाऊंडेशनच्या संचालकपदाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा स्वीकारावा अशी मी विनंती करते. तुम्ही दिलेल्या या संधीबद्दल मनस्वी आभारी आहे", असं तिने म्हटलं आहे. "कधीकधी शांतता दूर असल्यासारखी भासते", असं कॅप्शन तिने दिलं आहे. 

पायलने केलेल्या या पोस्टमुळे तिच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. पायलने संग्राम सिंहसोबत २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण, आता लग्नानंतर ३ वर्षांतच त्यांच्यात दुरावा आल्याचं दिसत आहे. पायल आणि तिच्या पतीमध्ये ७ वर्षांचं अंतर आहे. पायल संग्रामपेक्षा ७ वर्षांनी मोठी आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारपायल रोहतगी