इंडियन आयडल 12 चा ग्रेट ग्रँड फिनाले (Indian Idol 12 grand finale) तासातासाला रंगत गेला. स्पर्धकांचे, जजेसचे आणि स्पेशल गेस्टचे एकापेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स आणि याचदरम्यान भारती सिंह व हर्ष यांच्या कॉमेडीचा तडका अशी मस्त मेजवाणी चाहत्यांना मिळाली. अरूणिता (Arunita Kanjilal) व पवनदीप (Pawandeep Rajan) या सीझनच्या सर्वात लोकप्र्रिय जोडीची हर्ष व भारतीने अशी काही मजा घेतली की, सर्व जण पोट धरून हसले.
होय, शोमध्ये अरूणिता व पवनदीपची ‘लव्हस्टोरी’ चांगलीच गाजली. अर्थात हा सगळा टीआरपीसाठी केलेला ड्रामा होता. पण शेवटपर्यंत या ड्राम्याने चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन केले. फिनालेमध्ये पवनदीपने मोठ्या प्रेमाने अरूणिताला फुल दिले. पण हे फुल गुलाबाचे नव्हते तर फुलकोबीचे होते.हे पाहून सगळेच खळखळून हसायला लागले. अगदी पवनदीपच्या आईबाबांनाही हसू आवरले नाही.
लेकासमोर केले प्रपोजफिनालेमध्ये असाच एक मजेशीर क्षण पाहायला मिळाला. होय, दिग्गज गायक उदित नारायण स्टेजवर आले आणि लेकासमोरच अल्का याज्ञिक यांच्यासोबत फ्लर्ट करू लागले. आज मी अल्काकडून आय लव्ह यू वदवून घेणार, असे ते म्हणाले. त्यांच्या या वाक्यावर एकच खसखस पिकली..