Join us

"मी फक्त नववी शिकलीये...", रुपाली भोसलेने पहिल्यांदाच केला शिक्षणाबद्दल खुलासा, म्हणाली-"परिस्थितीमुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 12:27 IST

मालिकाविश्व गाजवणाऱ्या रुपाली भोसलेचं शिक्षण किती? स्वत:च केला खुलासा;म्हणाली-"परिस्थितीमुळे..."

Rupali Bhosale : मराठी मालिकाविश्वातील ग्लॅमरस अभिनेत्री म्हणजे रुपाली भोसले. आपल्या सहज सुंदर अभिनयाच्या जोरावर तिने मराठीसह हिंदी कलाविश्वातही वेगळं स्थान निर्माण केलंय.आई कुठे काय करते या मालिकने तिला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेत तिने साकारलेली संजना कायम चाहत्यांच्या मनात राहिल. आता रुपाली भोसले लवकरच नव्या भूमिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.याचनिमित्ताने अभिनेत्री मुलाखती देताना दिसते. त्यात आता अलिकडेच दिलेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या शिक्षणाविषयी पहिल्यांदाच खुलासा केला आहे. 

नुकतीच रुपाली भोसलेने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आयुष्यातील चांगल्या-वाईट अनुभवांवर भाष्य केलं. त्यादरम्यान, तिने आपल्या शिक्षणाविषयी देखील खुलासा केला. रुपाली फक्त नववी शिकली आहे. तेव्हा ती म्हणाली, " नववी शिकलेली मी मुलगी आहे. त्यावेळेला आमची तशी परिस्थिती नव्हती. तेव्हा माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट होती की संकेतने शिकावं.डोक्यात हाच विचार होता की, उद्या आई-बाबांना किंवा घर हे संकेत सांभाळणार आहे. त्यामुळे त्याने शिकलं पाहिजे, असं वाटत होतं. आपलं काय लग्न होणार आणि आपण नवऱ्याच्या घरी जाणार, नवरा सगळं बघेल. अशी  विचार करण्याची पद्धत होती. लहान असताना तेव्हा काहीच समजायचं नाही."

पुढे रुपाली म्हणाली, "पण, आज ते होणार नाही. मला जर कोणी एखादी स्क्रिप्ट दिली तर चाळीस पानांचा बंच दिला तर मी ती चाळीस पानं कुठेही न थांबता पाठ करु शकते. अभ्यास आता नाही येऊ शकत. कारण, आता त्या गोष्टींचा इंटरेस्ट राहिला नाही. शिक्षण हे महत्त्वाच आहेच पण काय कमी आहे. म्हणजे आज मी इतक्या लोकांबरोबर उठते बसते. तेव्हा जोपर्यंत मी त्यांना सांगत नाही तोपर्यंत त्यांना कळत नाही.म्हणून मला नाही वाटतं की माझ्या आयुष्यात कुठेतरी काही कमी आहे. जेव्हा मला असं वाटेल तेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी होईल. म्हणून मी त्या गोष्टींकडे बघतच नाही. माझ्याकडेची उजवी बाजू काय माझ्याकडे काय चांगलं आहे,याकडे मी बघते." अशा भावना रुपालीने व्यक्त केल्या.

टॅग्स :रुपाली भोसलेटेलिव्हिजनसेलिब्रिटीशिक्षण