Join us

कॅन्सरशी लढा देणाऱ्या हिना खानचं ट्रान्सफॉर्मेशन; Video शेअर करत म्हणाली, 'ब्रेकडाऊन...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 14:36 IST

लांब सुंदर केसांमधल्या लूकनंतर आता तिचा बॉयकट मधला लूक असं ट्रान्सफॉर्मेशन दाखवलं आहे.

अभिनेत्री हिना खानने (Hina Khan) काही दिवसांपूर्वीच ब्रेस्ट कॅन्सर झाल्याची धक्कादायक बातमी दिली. हिनाला स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सरचं निदान झालं आहे. सध्या ती कॅन्सरवर उपचार घेत आहे. किमोथेरपीच्या आधीच हिनाने तिचे केस कापले. याचा व्हिडिओ तिने शेअर केला होता. मनावर दगड ठेवत नंतर त्रास होऊन नये म्हणून तिने आधीच हे पाऊल उचललं. आता हिनाने आपल्या या ट्रान्सफॉर्मेशनचं एक रील शेअर केलं आहे.

हिना खान सध्या कॅन्सरशी लढा देत आहे. या प्रवासात ती प्रचंड पॉझिटिव्ह राहत आहे. वेळोवेळी ती सोशल मीडियावर अपडेट्स शेअर करत असते. तिची जिद्द खरोखरंच वाखणण्याजोगी आहे. हिनाने काही वेळापूर्वीच एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तिच्या लांब सुंदर केसांमधल्या लूकनंतर आता तिचा बॉयकट मधला लूक असं ट्रान्सफॉर्मेशन दाखवलं आहे. यात हिनाने चेहऱ्यावरची स्माईल अजिबातच जाऊ दिलेली नाही. ती लिहिते, 'गंमतीत सांगायचं तर सध्याच्या माझ्या परिस्थितीत मला हे ट्रान्सफॉर्मेशन सूट करत आहे. केस का कापलेस? सॉरी यार ब्रेकडाऊन झालं आहे. कृपया सगळे जास्तीत जास्त हसूया. मी हार मानणार नाही. अल्लाहवर माझा अढळ विश्वास आहे."

यासोबतच हिनाने स्टोरी शेअर करत तिला धीर देणाऱ्या सर्वांचेच आभार मानले. फिल्म इंडस्ट्री, स्पोर्ट्स, डॉक्टर्स, मित्रपरिवार अशा सर्वांनीच तिला मेसेज करुन दिलासा दिला. हिना सध्या प्रचंड वेदनेतून जात आहे. दोन दिवसांपूर्वी तिने 'अल्लाह प्लीज, ही वेदना कमी कर' अशी स्टोरी ठेवली होती. मोठ्या धैर्याने ती प्रत्येक दिवसाला सामोरी जात आहे. 

टॅग्स :हिना खानस्तनाचा कर्करोगसोशल मीडियाटेलिव्हिजन