आरती सोलंकी ही प्रसिद्ध कॉमेडियन असून फू बाई फू या कार्यक्रमामुळे तिला प्रसिद्धी मिळाली.
आस्ताद काळेने आजवर अग्निहोत्र, पुढचे पाऊल यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. तो सध्या सरस्वती या मालिकेत राघवची भूमिका साकारत आहे.
अनिल थत्ते हे पत्रकार असून ते त्यांच्या राहणीमानामुळे ओळखले जातात.
भूषण कडूने मस्त चाललंय आमचं, दगडाबाईची चाळ, बत्ती गुल पॉवर फुल यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
जुई गडकरीला पुढचे पाऊल या मालिकेमुळे खरी लोकप्रियता मिळाली. तिने नुकतेच सरस्वती या मालिकेत देविका ही भूमिका साकारली होती.
मेघा धाडेने मानसन्मान, एक होती राणी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
पुष्कर जोगने जबरदस्त, सत्या, तुक्या तुकविला नाग्या नाचविला यांसारख्या मराठी चित्रपटात तसेच हद करदी अपने, वचन दिले तू मला यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे.
राजेश शृंगारपुरेने झेंडा या चित्रपटात साकारलेली भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. राजेशने डॅडी, सरकार राज यांसारख्या हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
रेशम टिपणीसने कॅम्पस, बसेरा, सतरंगी ससुराल यांसारख्या मालिकांमध्ये तर बाजीगर, जय हो यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे.
ऋतुजा धर्माधिकारीने रात्रीस खेळ चाले या मालिकेत साकारलेली सुषमा ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.
सई लोकुरने कपिल शर्माच्या किस किस को प्यार करूँ या चित्रपटात काम केले होते.
स्मिता गोंदकरला पप्पी दे पारूला या गाण्यामुळे प्रसिद्धी मिळाली. तिने मुंबईचा डब्बेवाला, हिप हिप हुर्रे यांसारख्या मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सुशांत शेलारने क्लासमेट, दुनियादारी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
उषा नाडकर्णी यांनी माहेरची साडी, सिंहासन यांसारख्या अनेक मराठी तर वास्तव, वन टू थ्री यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पवित्र रिश्ता या मालिकेत त्यांनी साकारलेली खाष्ट सासूची भूमिका चांगलीच गाजली होती.
विनीत भोंडेला चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे चांगलीच लोकप्रियता मिळाली. या कार्यक्रमात त्याने साकारलेल्या व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी नेहमीच डोक्यावर घेतल्या आहेत.