Join us

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेतील स्वीटूची सुमन काकी खऱ्या आयुष्यात दिसते बघा कशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2021 08:00 IST

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत सध्या सुमन काकी म्हणजेच शुभांगी भुजबळचे खऱ्या आयुष्यातले फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्काच बसेल.

'येऊ कशी तशी मी नांदायला' सुरुवातीपासूनच मालिकेने रसिकांची पसंती मिळवत लोकप्रिय मालिका बनली. ही मालिका छोट्या पडद्यावर आता रंजक वळणावर आली आहे.मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. पाहात असणा-यांसाठी सुमन काकी काही नवीन नाही. मालिकेत स्विटूच्या काकीची म्हणजेच सुमन साळवी ही भूमिका साकारत आहेत. कठीण प्रसंगी खांद्याला खांदा भिडवून राहणारी राहणारी सुमन काकी देखील रसिकांची आवडती बनली आहे. सुमन काकी ही भूमिका या अभिनेत्रीचे नाव आहे अभिनेत्री शुभांगी भुजबळ.

मालिकेतल्या इतर भूमिकांमुळेही  शुभांगी आपल्या सहजसुंदर अभिनयामुळे प्रेक्षकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. सध्या सुमन काकी म्हणजेच शुभांगी भुजबळचे  खऱ्या आयुष्यातले फोटो व्हायरल होत आहेत. हे फोटो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्काच बसेल. 

मालिकेत अतिश साध्या अंदाजात दिसणारी सुमन काकी  खऱ्या आयुष्यात मात्र  फारच सुंदर दिसते. तिच्या या फोटोंना रसिकांचीही प्रचंड पसंती मिळत आहे. शुभांगीचा ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन लूक पाहून तुम्हीही चक्रावून जाल. इन्स्टाग्रामवर शुभांगीचे असे बरेच फोटो तुम्हाला पाहायला मिळतील. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या सगळ्या फोटोंमध्ये शुभांगीचं सौंदर्य आणखीनच खुलून गेल्याचं पाहायला मिळत आहे.

मालिकेच्या सेटवर शूटिंगमधून वेळ मिळताच सुमन काकी म्हणजेच शुभांगी मस्त सहकलाकारांसोबत मजामस्ती करण्यात दंग होतात. याच धम्माल मस्तीचे फोटो सोशल मीडियावर तुम्हाला पाहायला मिळतील. या फोटोंवरुनच खऱ्या आयुष्यातही शुभांगी मात्र अतिशय मनमौजी धमाल करणारी असल्याचे तुम्हाला जाणवेल.