Join us
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही कधी श्रेया बुगडेच्या बहिणीला बघितलंय का दिसते तिच्याएवढीच सुंदर, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2021 09:00 IST

श्रेया बुगडेप्रमाणेच तिची बहिणही दिसायला सुंदर आहे. दोन्ही बहिणींचे फोटो पाहून चाहते त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोनं अवघ्या महाराष्ट्राला हसवत मनोरंजन केलं आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर जगभरातील मराठी रसिकांवर चला हवा येऊ द्या या शोनं जादू केली आहे. या शोमधील विनोदवीर कुशल बद्रिके, सागर कारंडे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे, डॉ. निलेश साबळे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. या विनोदवीरांमध्ये आणखी एक नाव आवर्जून घ्यावं लागेल.

विनोदवीर पुरुषांमध्ये श्रेया बुगडे हिने आपल्या कॉमेडीच्या भन्नाट टायमिंगने रसिकांच्या काळजात वेगळं स्थान मिळवलं आहे. महिला कॉमेडीयन म्हणून श्रेयाने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. याच श्रेया बुगडेबद्दल जाणून घेण्यासाठी रसिक कायमच उत्सुक असतात. 

सोशल मीडियावरही श्रेयाची बरीच चर्चा असते. तिचे विविध फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोंना रसिकांकडून लाइक्स आणि कमेंट्स मिळत असतात. श्रेया अनेकदा कुटुंबासोबत फोटो शेअर करत चाहत्यांची वाहवा मिळवत असते. सोशल मीडियावर नजर टाकल्यास तुम्हाला तिचे कुटुंबासह घालवलेले खास क्षण पाहायला मिळतील. 

श्रेयाचे असेच काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यावेळी श्रेयासोबत तिची बहीणही दिसत आहे. श्रेयापेक्षा चाहत्यांचे लक्ष बहिणीच्याच फोटोवर खिळले आहे. श्रेयाप्रमाणेच तिची बहिणही दिसायला सुंदर आहे. दोन्ही बहिणींचे फोटो पाहून चाहते त्यांच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहेत.

 

श्रेयाच्या बहिणीचे नाव तेजल आहे. तेजलही श्रेयाची मोठी बहिण आहे.दोघी बहिणींमध्ये प्रचंड जिव्हाळ्याचं नातं आहे. दोघांमध्ये खूप चांगले बॉन्डींग असल्याचे फोटोंमध्ये पाहायला मिळेल. आपल्या बहिणीसोबतचे बरेचसे फोटो श्रेया इन्स्टाग्रामवर शेअर करत असते.

वेळ मिळताच श्रेया बहिणीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंड करताना दिसते. दोघांच्याही आवडी-निवडी अगदी सारख्याच आहेत. श्रेया आपल्या अदा, स्टाईल, लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.  फॅशन आणि स्टाईलमध्ये श्रेयाप्रमाणे तेजलही तितकीच सजग आहे.सध्या श्रेयाप्रमाणे तिच्या बहिणीच्या फोटोंवरही चाहते लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

टॅग्स :श्रेया बुगडेचला हवा येऊ द्या