Join us  

प्रसिद्ध कॉमेडियनने उडवली अरबाज,सोहेलच्या करिअरची खिल्ली; म्हणाला, 'इतक्या वर्षात यांनी...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2024 10:59 AM

Harsh gujral: हर्षने उडवलेल्या खिल्लीमुळे अरबाजने ही त्याला प्रत्युत्तर देत धमकी दिल्याचं पाहायला मिळालं.

बॉलिवूडमध्ये खानदानाचा चांगलाच दबदबा असल्याचं साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे आज सलमान, सोहेल आणि अरबाज या तीन भावंडांच्या जोडीला कोणी ओळखत नाही असं म्हणणारा एकही व्यक्ती शोधून सापडणार नाही. आजवरच्या कारकिर्दीत या तीनही भावंडांनी अनेक सुपरहिट सिनेमा बॉलिवूडला दिले. केवळ अभिनयच नाही तर या तिघांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही नशीब आजमावलं आहे. परंतु, सलमानच्या तुलनेत सोहेल आणि अरबाज यांना म्हणावी तितकी प्रसिद्धी मिळाली नाही. त्यांची कारकिर्द सरासरी राहिली. यामध्येच आता प्रसिद्ध कॉमेडियन हर्ष गुजराल याने सोहेल आणि अरबाजची खल्ली उडवली.

सध्या सोशल मीडियावर हर्ष गुजराल याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात हर्षने सोहेल आणि अरबाज यांच्या फ्लॉप करिअरची खिल्ली उडवली आहे. मात्र, त्याची मस्करी ऐकून अरबाजने त्याला थेट धमकी दिली. अर्थात हा सगळा मजेचा भाग होता. मात्र, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हर्षने उडवली अरबाज-सोहेलची खिल्ली

अलिकडेच मॅडनेस मचाएंगे या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाला. या प्रोमोमध्ये हर्षने अरबाज-सोहेलची मस्करी केली. गेल्या ३०-४० वर्षांमध्ये या दोघांनी काय केलंय तेच समजत नाही. सकाळी म्हणतात आम्ही अभिनेता आहोत. मग दुपारी सांगतात आम्ही प्रोड्युसर आहोत. संध्याकाळ होत नाही तर बोलतात की आम्ही दिग्दर्शक आहोत. आणि, रात्री १० नंतर माहोल तयार झाला तर ते थेट सलमान खान होतात.  त्याची ही कॉमेडी ऐकून हुमा कुरेशी, सोहेल आणि अरबाज सगळेच हसायला लागतात.

अरबाजने दिली धमकी

जोपर्यंत हा शो सुरु आहे तोपर्यंत तू हसणार आहेस. पण, त्यानंतर जेव्हा शो संपेल तेव्हा मात्र आम्ही दोघे हसू असं अरबाज म्हणतो. त्यावर हर्ष हात जोडतो. दरम्यान, या शोचा आणखी एक प्रोमो समोर आला आहे. ज्यात हर्षने अरबाजच्या दुसऱ्या लग्नाची खिल्ली उडवली होती.

टॅग्स :टेलिव्हिजनअरबाज खानसोहेल खानटिव्ही कलाकारहुमा कुरेशी