Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक जोशीचा 'जाऊ बाई गावात' शो अंतिम टप्प्यात! कोण असेल पहिल्या पर्वाचा विजेता?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 18:45 IST

Jau Bai Gavaat Show :अभिनेता हार्दिक जोशीचा बहुचर्चित शो ‘जाऊ बाई गावात’ अंतिम टप्प्यात आला आहे. ११ फेब्रुवारी रोजी या शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे.

झी मराठी वाहिनीवरील अभिनेता हार्दिक जोशी(Hardik Joshi)चा बहुचर्चित शो ‘जाऊ बाई गावात’ (Jau Bai Gavaat) अंतिम टप्प्यात आला आहे. ११ फेब्रुवारी रोजी या शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. हे पर्व विशेष गाजलं ते म्हणजे स्पर्धक, त्यांना दिलेले टास्क, स्पर्धकांनी गावकऱ्यांची जिंकलेली मन यामुळे. या फिनाले आठवड्यात स्थान मिळविणारे टॉप ५ स्पर्धक आहेत रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, स्नेहा भोसले आणि श्रेजा म्हात्रे. महाअंतिम सोहळ्याचा गावकऱ्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्रात उत्साह निर्माण झाला आहे. 

तीन महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर, 'जाऊ बाई गावातचे' हे स्पर्धक शोच्या ग्रँड फिनालेसाठी तयारी करत आहे. सीझनच्या विजेत्याचा किताब पटकावण्यासाठीचा अत्यंत अपेक्षित क्षण आठवड्याच्या शेवटी होणार आहे. या अंतिम भागात स्पर्धकांच्या आता पर्यंतच्या प्रवासाची झलक पाहायला मिळेल. त्यासोबत हे फायनॅलिस्ट स्पर्धक दमदार परफॉर्मेंस सादर करणार आहे. तर खास पाहुणे बनून येणार आहेत सर्वांचे लाडके भाऊजी आदेश बांदेकर, त्यांचा सोबत असणार आहेत सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर. सोनालीचा दिलेला मजेशीर टास्क स्पर्धक आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणार असणार आहे. आणि महेश मांजरेकर सर आले म्हणजे स्पर्धकांची शाळा भरणार हे नक्की.

आता फक्त प्रतीक्षा आहे महाअंतिम सोहळ्याची. तुम्हाला पण उत्सुकता असेल ना 'जाऊ बाई गावात' च्या ह्या पहिल्या पर्वाच्या विजेता कोण असेल याची. तर मनोरंजनानी भरलेली ही संध्याकाळ मिस करून नका. ११ फेब्रुवारी रोजी 'जाऊ बाई गावात'चा महाअंतिम सोहळा संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळेल.

टॅग्स :हार्दिक जोशीझी मराठी