Hardeek Joshi: अभिनेता हार्दिक जोशी हे नाव मालिका प्रेमींसाठी काही नवीन नाही. झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून तो महाराष्ट्रातील घराघरात पोहोचला. या मालिकेत त्याने साकारलेल्या राणाच्या भूमिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. तु्झ्यात जीव रंगला मालिकेतील त्याची आणि अक्षया देवधरची केमिस्ट्री अनेकांना आवडली होती. मात्र, या सगळ्या प्रवासात अभिनेत्याला त्याच्या कुटुंबियांचा मोठा पाठिंबा होता.विषेश म्हणेज हार्दिकची वहिनी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. परंतु, २०२३ मध्ये त्याच्या वहिनीचं निधन झालं. या प्रसंगामुळे हार्दिक पूर्णपणे खचून गेला होता. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील या कठीण प्रसंगावर भाष्य केलं आहे.
हार्दिक आणि त्याच्या वहिनीचं जवळचं नातं होतं. आपल्या वहिनीची उणीव अभिनेत्याला कायम भासत असते.नुकतीच त्याने मित्र म्हणे ला मुलाखत दिली. त्यावेळी त्या कठीण प्रसंगाविषयी सांगताना अभिनेता म्हणाला, "कॉलेज वगैरे संपल्यानंतर आपण बरेचसे कोर्सेस करतो. त्यावेळी मी ज्यूनिअर आर्टिस्टचं,मॉडेलिंग काम करायचो. त्याकाळात वहिनीने खूप पाठिंबा दिला. तेव्हा भावाने आणि वहिनीने बुलेट घेतली होती.उलट दादा रिक्षाने जायचा. त्यांनी मला ती बुलेट ऑडिशन्सला जाताना दिली. त्यानंतर घरातील पहिली गाडी देखील तिनेच घेतलेली.तुला नोकरी नाही करायची ना? मग नको करू असं तिचं ठाम होतं. राणाची वहिनी म्हणून तिला कोणी ओळखलं तर ती प्रचंड खुश व्हायची. वहिनी होती म्हणून कुठेतरी मी एक कलाकार म्हणून उभा राहिलो.आमच्या वहिनी-दीरापेक्षा आमच्यात भावा-बहीणीचं नातं होतं. "
अक्षयाने सपोर्ट केला...
त्यानंतर हार्दिक म्हणाला, "त्यावेळी मी इमोशन झालो होतो कारण, एक आधारच गेला होता.घरात हसतं-खेळतं वातावरण होतं, वहिनी सोडून गेली आणि होत्याचं नव्हतं झालं. या सगळ्यात मला अक्षयाने खूप सपोर्ट केला. तिने स्वत च करिअर थांबवलं. तिला खूप मालिका विचारण्यात आल्या. पण,तिने माझ्यासाठी १२-१३ मालिका सोडल्या. अक्षयाचं म्हणणं असं होतं की,तुझं काम चालू आहे तर कर, घराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. "
वहिनीचे अंत्यसंस्कार करुन शूटवर गेलो...
मग हार्दिकने सांगितलं, "जाऊबाई गावात मिळालं,त्याच्यानंतर मी प्रोमो वगैरे शूट केला. जेव्हा प्रोमो ऑन एअर जाणार तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं,आता कधी काहीही होऊ शकतं. मी लगेचच झीच्या ऑफिसला फोन केला आणि सांगितलं मी शो सोडतोय. त्यानंतर झी मराठीची टीम पुण्यात आली. त्यांनी हॉस्पिटलला वहिनीला पाहिलं. ते म्हणाले, काहीही काळजी करू नकोस आम्ही तुझ्यासोबत आहोत. तेव्हा वहिनीला समजलं की मी शो सोडतोय. तेव्हा तिला ऑक्सिजन लावलेलं होतं. बोलता येत नव्हतं तरीही ती मला म्हणाली, तू हा शो सोडलास तर बघ... मला प्रामिस कर तू हा शो सोडणार नाहीस.पण,दुर्दैवाने पहिला एपिसोड आला तेव्हा वहिनी नव्हती. योगायोग असा पण आहे, एपिसोड जेव्हा आला ती वहिनीची जन्मतारीख आहे. म्हणजे कुठेतरी तिचा मला आशीर्वाद होता. त्या पहिल्या एपिसोडसाठी वहिनीचे अंत्यसंस्कार करुन गेलो. प्रेक्षकांना वाटतं की हे मजा करतात वगैरे पण तसं नसतं. शेवटी शो मस्ट गो ऑन.. हे पाळावं लागतंच." असा भावुक प्रसंग अभिनेत्याने शेअर केला.
Web Summary : Hardeek Joshi, supported by his sister-in-law, shared an emotional story about her support during his early career. After her death, Akshaya paused her career to support Hardeek. He performed her last rites and went straight to shooting.
Web Summary : हार्दिक जोशी ने अपनी भाभी के समर्थन से प्रेरित होकर अपने शुरुआती करियर के दौरान उनके समर्थन की एक भावुक कहानी साझा की। उनकी मृत्यु के बाद, अक्षया ने हार्दिक का समर्थन करने के लिए अपने करियर को रोक दिया। उन्होंने उनका अंतिम संस्कार किया और सीधे शूटिंग पर चले गए।