Join us

अक्षयाला वाढदिवशी मिळालं खास गिफ्ट! हार्दिक जोशीने शेअर केला पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर, बघा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2025 11:08 IST

हार्दिक जोशीने त्याची पत्नी अक्षयाच्या वाढदिवशी त्याच्या पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर शेअर केला आहे. हार्दिक अॅक्शन करताना दिसणार आहे

'तुझ्यात जीव रंगला' फेम हार्दिक जोशी (hardik joshi) आणि अक्षय देवधर (akshaya deodhar) या जोडीने काही वर्षांपूर्वी एकमेकांसोबत लग्न केलं. दोघेही सोशल मीडियावर सक्रीय असतात. याशिवाय एकमेकांसोबतचे रोमँटिक फोटो पोस्ट करताना दिसतात. आज अक्षयाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने हार्दिक जोशीने बायकोला वाढदिवसाचं खास गिफ्ट दिलं आहे. हार्दिकने त्याच्या पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर सर्वांसोबत शेअर केला आहे. जाणून घ्या या सिनेमाबद्दल

हार्दिकचा पहिला हिंदी सिनेमा

हार्दिक जोशीने त्याच्या पहिल्या हिंदी सिनेमाची टीझर सर्वांसोबत शेअर केला आहे. या टीझरमध्ये दिसतं की, हार्दिक जोशी चेहऱ्यावर फडका बांधून समुद्रकिनारी हातात हत्यार घेऊन उभा आहे. त्याच्या समोर गुंडांची एक टोळी उभी आहे. हार्दिक जोशी त्यांना मारतो आणि चांगलाच धडा शिकवतो. त्यानंतर हार्दिकच्या चेहऱ्यावरचा कपडा बाजूला जातो. हार्दिकचा जबरदस्त आणि तडफदार लूक पाहायला मिळतो. 'गुरु-जी' असं हार्दिकच्या या हिंदी सिनेमाचं नाव आहे. 

"प्रत्येक हिरोसोबत त्याला दिशा दाखवणारी एक स्त्री असते. अक्षयाच्या वाढदिवशी मी माझ्या पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर सर्वांसोबत शेअर करत आहे. अक्षया हे तुझ्यासाठी", अशा शब्दात हार्दिकने त्याच्या पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर सर्वांसोबत शेअर केला आहे. हार्दिकच्या पहिल्या हिंदी सिनेमाचा टीझर बघताच लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत शिवाय अक्षयालाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अशाप्रकारे तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा आता हिंदीत वाटचाल करताना दिसणार आहे.

टॅग्स :हार्दिक जोशीअक्षया देवधरबॉलिवूडमराठी अभिनेताटेलिव्हिजन