Join us
Daily Top 2Weekly Top 5

निया शर्माची कारमधून चोरी झाली हँडबॅग, अभिनेत्रीने ट्विटरवर मागितली मुंबई पोलिसांकडून मदत

By गीतांजली | Updated: October 29, 2020 16:20 IST

निया शर्मा छोट्या पडद्यावरील स्टायलिश आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

निया शर्मा छोट्या पडद्यावरील स्टायलिश आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. अलीकडेच बर्थडेच्या केकला घेऊन झालेल्या अभिनेत्रीची बॅग चोरी झाली आहे. मुंबईच्या लोअर परळ भागात तिच्या कारमधून निया शर्माची  हँडबॅग चोरीला गेली. अभिनेत्रीने ट्विट करत पोलिसांनी मदत करण्याचे आवाहन केले होते ज्याचे मुंबई पोलिसांनी लगेच उत्तर दिलं. 

'नागिन 4' फेम अभिनेत्री निया शर्माने ट्विटरवर लिहिले, 'मुंबई पोलीस कोणीतरी माझ्या कारमधून माझी हँडबॅग चोरी केली आहे. सेनापती बापट मार्ग सिग्नल. लोअर परळ. आपली मदती माझ्यासाठी फार महत्त्वाची आहे.' नेहाने यासोबत आपली काळी रंगाच्या बॅगचा फोटो शेअर केला आहे. 

नियाच्या ट्विटनंतर मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवरुन याचे उत्तर देताना तिचा नंबर मेसेज करण्यासाठी सांगण्यात आला आहे. लवकर तिच्या संपर्क करण्यात येईल. लगेच रिप्लाय दिल्यामुळे नियाने मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. 

नियाने काही दिवसांपूर्वीच तिचा 30वा वाढदिवस साजरा केला आहे. निया शर्माच्या वाढदिवस चांगलाच चर्चेत आला होता तो केकमुळे.   केकवरील डिझाईनमुळे ती ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली होती. केक किती अश्लिल आहे, नियाने सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत. ती एक सेलिब्रेटी आहे तिने सोशल मीडियावर काय शेअर करावे काय नको हे तिला कळायला हवे. तिचे असंख्य चाहते आहेत हे सगळं पाहून काय वाटेल याचाही विचार नियाने केला नाही. नियाकडून अशी अपेक्षाच नव्हती. अशा लोकांमुळेच इंडस्ट्री आज बदनाम असल्याचेही युजर्स म्हणाले होते.  

टॅग्स :निया शर्मा