ग्रेसी गोस्वामीला दुखापत;चित्रीकरणाचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2018 09:43 IST
छोट्या पडद्यावरील 'मायावी मलिंग' मालिकेत भूमिका रंगविणारी अभिनेत्री चित्रीकरणादरम्यान जिन्यावरून घसरून पडल्याने तिला दुखापत झाली आहे.या दुर्घटनेमुळे मालिकेचे चित्रीकरण ...
ग्रेसी गोस्वामीला दुखापत;चित्रीकरणाचा खोळंबा
छोट्या पडद्यावरील 'मायावी मलिंग' मालिकेत भूमिका रंगविणारी अभिनेत्री चित्रीकरणादरम्यान जिन्यावरून घसरून पडल्याने तिला दुखापत झाली आहे.या दुर्घटनेमुळे मालिकेचे चित्रीकरण काही तास ठप्प पडले होते.चित्रीकरण सुरू असताना ग्रेसी अनवधानाने काही पाय-यांवरून घसरून खाली पडली आणि तिला दुखापत झाली. या घटनेनंतर मालिकेचे चित्रीकरण तीन तासांपेक्षा अधिक काळ थांबवावे लागले. ग्रेसीला तात्काळ वैद्यकीय मदतीसाठी रुग्णालयात नेण्यात आले.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालिकेतील एक प्रसंग एका जिन्याजवळ चित्रीत होत होता.त्यावेळी ग्रेसीचा पाय घसरल्याने ती जिन्यावरून पडली आणि तिच्या पायाला दुखापत झाली.ग्रेसी घसरून पडल्यावर निर्मात्यांनी तिला तात्काळ डॉक्टरांकडे नेले आणि त्यांनी तिला संपूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला, असे सूत्रांनी सांगितले. तिच्या उजव्या गुडघ्याला मार बसला असून ती फिजिओथेरपीचा उपचारही घेत आहे.तिची परिस्थिती पाहिल्यावर निर्मात्यांनी तिच्याशिवाय मालिकेचे चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आणि तिने संपूर्ण बरी झाल्यावरच चित्रीकरण करावे, असा सल्लाही दिला. या घटनेवर प्रतिक्रिया देण्यासाठी संबंधित अभिनेत्रीशी संपर्क होऊ शकला नाही.'देहलिज','बेइन्तिहा',‘खूँखार : सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलन्स’ यांसारख्या मालिकांमध्ये हर्षद अरोराच्या भूमिका रसिकांच्या चांगल्याच पसंतीस उतरल्या होत्या.प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाने मोहिनी टाकणारा अभिनेता हर्षद अरोरा आता वेगळ्याच भूमिकेच्या माध्यमातून रसिकांच्या भेटीला येत आहे.अनेक वर्षे सकारात्मक भूमिका केल्यानंतर आता अखेर हर्षद अरोरा खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे.नवीन फँटसी फिक्शन 'मायावी मलिंग'मध्ये तो खलनायकाची भूमिका साकरणार आहे.आपल्या आपल्या नवीन शो मायावी मलिंगबद्दल हर्षदने सांगितले की, हा शो प्रेक्षकांना तीन राजकुमाऱ्या आणि आपले राज्य वाचवण्यासाठी त्यांचा लढा यांसोबत फँटसीच्या दुनियेत घेऊन जाईल.