Join us
Daily Top 2Weekly Top 5

छोट्या पडद्यावरील ही प्रसिद्ध अभिनेत्री तीन वर्षांनी परतणार जीव माझा गुंतला मालिकेद्वारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 11:52 IST

तीन वर्षानंतर ही अभिनेत्री पुन्हा एकदा कलर्स मराठीवरील “जीव माझा गुंतला” या नव्या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे.

ठळक मुद्देघाडगे & सून या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये अबाधित स्थान मिळवले.

कलर्स मराठीवर जीव माझा गुंतला मालिकेचे प्रोमो सुरू झाल्यापासून मालिकेबद्दल प्रेक्षकांच्या मनामध्ये बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे. मालिकेचे कथानक काय असेल, कोण कोण कलाकार मालिकेत असतील? 

घाडगे & सून या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. या मालिकेने प्रेक्षकांच्या मनामध्ये अबाधित स्थान मिळवले. या मालिकेतील सगळीच पात्र प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहेत. कियारा ही भूमिका तर प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. कियाराची भूमिका साकारणारी प्रतिक्षा मुणगेकर तीन वर्षानंतर पुन्हा एकदा कलर्स मराठीवरील “जीव माझा गुंतला” या नव्या मालिकेमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. प्रतिक्षा मालिकेत चित्रा खानविलकरच्या भूमिकेत दिसणार आहे. याबद्दल बोलताना ती सांगते, “खरं सांगायचं तर मला घरी परतल्यासारखं वाटत आहे. तब्बल तीन वर्षांनंतर मी पुन्हा कलर्स मराठीवर मालिका करते आहे आणि टेल-अ-टेल मीडियाचं प्रॉडक्शन हाऊस आहे, हा एक योगायोगा म्हणावा लागेल. वाहिनी आणि प्रॉडक्शन हाऊसने इतका विश्वास दाखवला आहे त्यामुळे माझी जबाबदारी खूप वाढली आहे असं मला वाटतं. खूप मजा येते आहे सेटवर, तीच लोकं आहेत आजूबाजूला, खूप सकारात्मक वातावरण आहे. त्याच जोमाने काम करणार आहे. ज्याप्राकरे कियारावर प्रेम केलं तसेच चित्रावर देखील करा हीच इच्छा आहे.

 दोन विरुद्ध विचारांच्या, भिन्न स्वभावाच्या व्यक्ती एकमेकांसमोर आल्या तर काय घडतं? अंतरा आणि मल्हारच्या बाबतीत असंच काहीसं घडणार आहे. दोघेही एकमेकांचा तिरस्कार करतात, पण नियती आपला डाव खेळतेच. मल्हार-अंतरा यांना नियती एका सूत्रात बांधते आणि मग कसोटी लागते नात्याची. हे दोघे नियतीवर मात करून पुढचा प्रवास कसा करतील हे बघणे उत्कंठावर्धक असणार आहे. 

टॅग्स :घाडगे अँड सून