Join us
Daily Top 2Weekly Top 5

संजय दत्तचा 'वास्तव' सिनेमा पाहून गौरव मोरेने ठरवलेली ही गोष्ट, अभिनेत्याचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2024 19:30 IST

गौरव मोरेने एका पॉडकास्ट मुलाखतीत संजय दत्तचा वास्तव पाहून काय प्रेरणा मिळाली याचा खास खुलासा केलाय (gaurav more)

गौरव मोरे हा 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील लोकप्रिय अभिनेता. गौरवला आपण विविध सिनेमा, वेबसिरीज आणि रिअॅलिटी शोमध्ये अभिनय करताना पाहिलंय. गौरव मोरेने मेहनतीच्या जोरावर आज मनोरंजन विश्वात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय. एक विनोदी अभिनेता म्हणून आज गौरव मोरेला इंडस्ट्रीत मानाचं स्थान आहे. अशातच वायफळ पॉडकास्ट चॅनलला दिलेल्या मुलाखतीत गौरवने संजय दत्तच्या 'वास्तव' सिनेमातून त्याला काय प्रेरणा मिळाली हे सांगितलंय.

गौरव मोरेने खुलासा केला की,  "आम्ही चाळीत डान्स करायचो. तेव्हा वास्तव सिनेमा आला होता संजय दत्तचा. तेव्हा आम्ही ठरवलं होतं पावभाजीचा धंदा करु. पावभाजीच्या धंद्यात खूप पैसा आहे. असं आम्ही ठरवलं होतं. पुढे शाळा सुटल्यावर एका चहावाल्याला आम्ही मदत करायचो. किटली वगैरे उचलायला. तेव्हा ठरवलं होतं की चहाची टपरी टाकू. त्यात खूप पैसा आहे."

अशाप्रकारे गौरव मोरेने 'वास्तव' सिनेमा पाहून त्याने आणि त्याच्या मित्रांनी काय चर्चा केली होती याचा खुलासा केलाय. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मध्ये विविध भूमिका साकारुन गौरव मोरेने प्रेक्षकांना खळखळून हसवलंय. गौरव सध्या हिंदी रिअॅलिटी शोमध्ये छाप पाडतोय. गौरव सध्या 'मॅडनेस मचाएंगे' या शोमध्ये झळकत आहे. काहीच दिवसांपुर्वी गौरवने बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलासोबत एक खास स्किट केलेलं.

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठी