Join us

गाथा नवनाथांची मालिकेत पाहायला मिळणार नवनाथांचा महिमा, हा अभिनेता दिसणार नवनाथांच्या भूमिकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 20:05 IST

महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, पण त्यांच्यावर टेलिव्हिजनवर कोणतीही मालिका झालेली नाही.

ठळक मुद्देही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत.

महाराष्ट्रात नाथसंप्रदाय हा बऱ्याच मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, पण त्यांच्यावर टेलिव्हिजनवर कोणतीही मालिका झालेली नाही. सोनी मराठी वाहिनी टेलिव्हिजनवर नवनाथांवर मालिका येणार असून 'गाथा नवनाथांची' असे या मालिकेचे नाव आहे. ही मालिका २१ जूनपासून सोम.-शनि., संध्या. ६:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  

कलयुगात जेव्हा मनुष्यावर असुरी शक्ती वरचढ होऊ लागली, तेव्हा मनुष्यकल्याणासाठी नवनारायणांनी नवनाथांच्या रूपात अवतार घेतला. या मालिकेत मच्छिन्द्रनाथांच्या भूमिकेत जयेश शेवाळकर दिसणार आहे, तर अनिरुद्ध जोशी गोरक्षनाथांची भूमिका साकारणार आहे. नकुल घाणेकर आणि शंतनू गंगणे हे कलाकारही या मालिकेत दिसणार आहेत. 

ही पौराणिक मालिका असून त्या काळाला साजेसे नेपथ्य, कलाकारांचे पेहराव हे भव्यदिव्य आणि पारंपरिक असणार आहेत. अशा प्रकारची पौराणिक मालिका करणं, हे आव्हात्मक असणार आहे. या मालिकेतून नवनाथांचा महिमा महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचणार आहे. 

टॅग्स :सोनी मराठी