Join us

गश्मीर महाजनीच्या प्रेमा तुझा रंग कसा या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार या गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 07:00 IST

प्रेमाची काळी बाजूही असते आणि ही बाजू अनेकदा अंधारात राहाते. प्रेमाची हीच काळी बाजू स्टार प्रवाह आपल्यासमोर मांडणार आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात प्रथमच केवळ प्रेमकथांतील गुन्ह्यांवर आधारित ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका स्टार प्रवाहवर येत आहे.

आजवर अनेक चित्रपट, साहित्यातून प्रेमाचं चित्रण करण्यात आलं आहे. त्यातून प्रेम हे अत्यंत भावनिक असतं, प्रेमाची भावना गुलाबी असते, असं दाखवण्यात आलं. वास्तवात मात्र प्रेमाची काळी बाजूही असते आणि ही बाजू अनेकदा अंधारात राहाते. प्रेमाची हीच काळी बाजू स्टार प्रवाह आपल्यासमोर मांडणार आहे. मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात प्रथमच केवळ प्रेमकथांतील गुन्ह्यांवर आधारित ‘प्रेमा तुझा रंग कसा’ ही मालिका स्टार प्रवाहवर येत आहे. १६ जुलैपासून रात्री दहा वाजता ही मालिका पाहता येणार आहे. अभिनेता गश्मीर महाजनी या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. 

स्टार प्रवाहने नेहमीच चाकोरीच्या बाहेरचा विचार केला आहे. वेगळे विषय, वेगळी मांडणी आणि नवीन कलाकार आपल्या कार्यक्रमांतून, मालिकांतून प्रेक्षकांसमोर आणले आहेत. म्हणूनच मराठी मनोरंजन क्षेत्रात स्टार प्रवाहची स्वतंत्र अशी ओळख आहे. हीच ओळख अधोरेखित करणार आहे प्रेमा तुझा रंग कसा ही नवी मालिका... सत्य घटनांपासून प्रेरित अशा प्रेमकथा, त्यातील गुन्हे, त्यांचा तपास या मालिकेतून दाखवला जाणार आहे. टेलिव्हिजनवर गुन्ह्यांच्या तपासावर आधारित अनेक कार्यक्रम झाले असले, तरी केवळ प्रेमाशी संबंधित गुन्ह्यांवर आधारित मालिका करण्याचा पहिला प्रयत्न स्टार प्रवाह करत आहे. त्यामुळेच ही मालिका वेगळी ठरणार आहे.

गश्मीर महाजनीने अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. उत्तम शरीरयष्टी, रफ अँड टफ लूक्स आणि धीरगंभीर आवाज ही गश्मीरची खासियत... गश्मीर या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. तो या मालिकेचे सूत्रसंचालन करणार आहे. त्याच्या खास शैलीने या मालिकेतल्या कथांचे नाट्य अधिक खुलणार आहे. गश्मीर महाजनीच्या मते ‘एक संवेदशनशील व्यक्ती म्हणून आणि एक कलाकार म्हणून आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींबाबत आपलं मत मांडणं हे मी माझं कर्तव्य समजतो. बऱ्या-वाईट घटनांबद्दल मी माझ्या कुटुंबाशी, माझ्या मित्रपरिवाराशी नेहमी संवाद साधतो. प्रेमा तुझा रंग कसा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आता प्रेक्षकांशीही मला मनमोकळा संवाद साधायला मिळणार आहे.’  

टॅग्स :गश्मिर महाजनी