Join us
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकली गंगूबाई झाली २१ वर्षांची, आता दिसते अशी, झालीय स्लीम अँड ट्रीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 11:59 IST

कॉमेडी करत असताना माझ्या शरीरावरून अनेकवेळा विनोद केले जात होते. मी ते ऐकून कॅमेऱ्यासमोर हसत असली तरी आतून मला खूप वाईट वाटायचे, असे सलोनी सांगते.

ठळक मुद्देसलोनी प्रचंड ग्लॅमरस झाली असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

मनोरंजन क्षेत्रात गंगुबाई या नावाने प्रसिद्ध असलेली बालकलाकार सलोनी दैनी आता खूपच बदलली आहे. आज तिचा २१ वा वाढदिवस असून तिचे चाहते तिला सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा देत आहे. सलोनीने गेल्या १४ महिन्यात २२ किलो वजन कमी केले असून ती प्रचंड स्लीम अँड ट्रीम दिसत आहे.

सलोनी प्रचंड ग्लॅमरस झाली असून तिचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे. सलोनी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असून ती तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. तिचे फोटो पाहून तिच्यावर लाईक्स आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लोक मला माझ्या शरीरावरुन नेहमीच चिडवायचे. एवढेच नव्हे तर मला हत्तीचं पिल्लू देखील म्हणायचे. माझ्या वयाच्या इतर मुलींच्या तुलनेत मी थोडी जाड होते. शिवाय माझी उंची देखील खूप कमी होती. त्यामुळे कॉमेडी करत असताना माझ्या शरीरावरून अनेकवेळा विनोद केले जात होते. मी ते ऐकून कॅमेऱ्यासमोर हसत असली तरी आतून मला खूप वाईट वाटायचे. त्यामुळे मी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला असे तिने नुकत्याच टेलिचक्करला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते.

सलोनीने व्यायाम आणि डाएट यांच्या मदतीने जवळजवळ २२ किलो वजन केवळ १४ महिन्यात कमी केले आहे. सलोनीने 2008 साली 'छोटे मिया' या लहान मुलांच्या कॉमेडी शोमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. या शोमध्ये ती गंगूबाई हे पात्र साकारायची. तिची ही व्यक्तिरेका त्यावेळी तुफान गाजली होती. आजही तिला गंगूबाई म्हणूनच ओळखले जाते. त्यानंतर तिने 'रावी', 'नमुने', 'बडे भैया की दुल्हनिया', 'तेडी मेढी फॅमेली', यह जादू है जिन्न का’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :सलोनी डॅनी