Join us

'चंद्रकांता' बनलेल्या कृतिका कामराचा पहिला फोटो आला समोर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2017 14:15 IST

एकाच नावाने दोन चॅनलवर सुरू होणारी मालिका चंद्रकांता सध्या खूप चर्चेत आहे. हळहळु या मालिकेसाठी निवड करण्यात आलेले चेहरे ...

एकाच नावाने दोन चॅनलवर सुरू होणारी मालिका चंद्रकांता सध्या खूप चर्चेत आहे. हळहळु या मालिकेसाठी निवड करण्यात आलेले चेहरे समोर येवू लागले आहेत. काही दिवसांपूर्वीच चंद्रकांताची भूमिका साकारणारी कृतिका कामराने तिच्या नवीन भूमिकेच्या लूकमधला फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. त्या फोटोत तिने तिचा चेहरा लपवला होता. आता तिने पुन्हा एकदा  काही नवीन फोटो शेअर केले आहेत. चंद्रकांताच्या लूकमध्ये असलेला पहिला फोटो तीने शेअर केला आहे. या मालिकेसाठी निरूशा निखतने कृतिकाचा हा कॉस्च्युम डिझाईन केला आहे. ‘देवों के देव- महादेव’ या आपल्या भव्य मालिकेनंतर निखिल सिन्हा यांनी ‘चंद्रकांता’ या मालिकेची निर्मिती केली आहे. येत्या मार्च महिन्यात चंद्रकांताचे प्रसारण करण्यात येईल असे मालिकेच्या टीमने सांगितले आहे. एकेकाळी दुरदर्शनवर हिट ठरलेली मालिका आता दोन दोन चॅनल्सवर प्रसारित होणार असल्यामुळे या मालिकेला रसिकांची कशी पसंती मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.1990 साली  दूरदर्शनवर  चंद्रकांताही मालिका हिट ठरली होती.या मालिकेत शीखा स्वरूपने चंद्रकांताच्या भूमिकेने सा-यांची मनं जिंकली होती.आता पुन्हा एकदा चंद्रकांताची तिच क्रेझ निर्माण करण्यासाठी कृतिका कामरा सज्ज झाली आहे. त्यानुसार आता पुन्हा एकदा चंद्रकांता सुरू होणार असली तरीही नवीन ढंगात ही मालिका रसिकांना पाहायला मिळेल.‘.देवकीनंदन खत्री यांच्या चंद्रकांता या 'कल्पनारम्य' कादंबरीवर ही मालिका आधारित आहे.