दीपिका कक्कर (Deepika Kakkar) टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. छोट्या पडद्यापासून दूर असली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. दीपिका सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. अभिनेत्रीने काल इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यात तिने तिला स्टेज २चा लिव्हर कॅन्सर असल्याचे सांगितले. दीपिकाने पती शोएबसोबतच्या व्लॉगद्वारे तिच्या आरोग्याची माहितीही दिली. यादरम्यान, अभिनेत्रीने तिचा मुलगा रुहानबद्दल काळजी व्यक्त केली. तिने सांगितले की, त्याला समजलंय की त्याची आई बरी नाही.
व्लॉगच्या सुरुवातीला शोएब इब्राहिमने दीपिकाच्या आरोग्याची माहिती दिली आणि सांगितले की, आधी आम्ही म्हणत होतो की दीपिकाच्या लिव्हरमध्ये टेनिस बॉल आकाराचा ट्यूमर आहे. पण आता रिपोर्ट्समधून असे समोर आले आहे की दीपिकाला स्टेज २चा लिव्हर कॅन्सर आहे. शोएबने पुढे सांगितले की, दीपिकाला सर्दी आणि खोकला असल्याने अद्याप शस्त्रक्रिया झालेली नाही. डॉक्टरांनी तिला पुढच्या आठवड्यात शस्त्रक्रियेसाठी बोलावले आहे. यादरम्यान दीपिका अनेक वेळा भावुक झाली. मात्र, दीपिकाने सांगितले की, कर्करोगाचे नाव ऐकून पूर्वी ती घाबरली होती. पण आता तिला खात्री आहे की ती त्यातून बाहेर पडेल. तिने असेही सांगितले की, डॉक्टरांनी सांगितले आहे की ती पूर्णपणे बरी होईल कारण हे वेळेत समजले आहे.
दीपिकाला वाटतेय रुहानची काळजीयानंतर दीपिकाने तिचा मुलगा रुहानबद्दल सांगितले. प्रथम शोएब रुहानबद्दल म्हणाला की, तो खूप समजूतदार झाला आहे. त्याला समजले आहे की काहीतरी गडबड आहे. आता त्याचे फिडिंग बंद केले आहे. यानंतर दीपिका म्हणते की त्याला आता समजले आहे की आईची तब्येत ठीक नाही. तो दिवसातून एकदा येऊन मला सांगतो पण आता त्याला समजले आहे. दीपिका पुढे म्हणते की सर्वजण तिथे आहेत, आम्ही खंबीर राहण्याचा प्रयत्न करत आहोत.
सर्वात कठीण टप्प्यातून जातोय व्लॉगमध्ये शोएब असेही म्हणतो की प्रत्येकजण आपल्या आयुष्यातील कठीण काळातून जातो. हा टप्पा आपल्यासाठी देखील आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा आहे. यानंतर, दीपिका म्हणते की डॉक्टरांनी पूर्ण आत्मविश्वासाने सांगितले आहे की, ते यातून तिला पूर्णपणे बरे करतील. डॉक्टर इतके आत्मविश्वासू आहेत, त्यामुळे आमचा आत्मविश्वासही वाढला आहे.
दीपिका कॅन्सरच्या नावाने घाबरत होतीदीपिका पुढे म्हणाली की, कॅन्सर हा शब्द प्रत्येकासाठी घाबरवणारा आहे. तो मानसिकदृष्ट्या जास्त घाबरवतो. पण डॉक्टरांनी सांगितले आहे की अशा परिस्थितीत तुमच्यासोबत असे घडले आहे की ते खूप सहजपणे बरे होईल. यानंतर शोएब म्हणाला की, अल्लाहचे आभार मानतो की दीपिकाला पित्ताशयातील स्टोनमुळे वेदना होत होत्या. जेव्हा वेदना बरी होत नव्हत्या तेव्हा आम्ही सीटी स्कॅन केला. ज्यामध्ये असे आढळले की एक ट्यूमर आहे. नंतर कळले की ते घातक आहे. पण त्यामुळे ही मोठी गोष्ट समजली हे चांगले आहे. त्याबद्दल अल्लाहचे आभार. हा परीक्षेचा काळ आहे आणि इंशाल्लाह हा काळही निघून जाईल.