Join us

'आई कुठे काय करते' मालिका घेणार लवकरच निरोप?, व्हायरल होतोय हा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2021 18:03 IST

'आई कुठे काय करते' ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे.

'आई कुठे काय करते' मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्वच पात्रांना रसिकांची पसंती मिळते आहे. ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून मालिकेत नवीन नवीन ट्विस्ट पहायला मिळत आहेत. मात्र आता ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याचे बोलले जात आहे. सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला आहे. तो पाहून नेटकरी मालिका लवकर निरोप घेणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोत अनिरुद्ध आणि अरुंधती वयस्कर झालेले दिसत आहे. ते एकत्र आले आहेत आणि उतारवयात त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पहायला मिळतो आहे. हा फोटो पाहून चाहत्यांचा गोंधळ उडाला आहे. आई कुठे काय करते ही मालिका संपणार का, आता अचानक असा निर्णय का घेतला आणि मालिकेचा शेवट काय असणार, संजना कुठे गेली असे असंख्य प्रश्न नेटकरी विचारत आहेत. 

दरम्यान, या फोटोने गोंधळ उडाल्यानंतर मालिकेतील ईशा म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा गोरे हिच्या एका चाहत्याने या फोटोमागचे सत्य सांगितले आहे. त्यामुळे चाहत्यांचा गोंधळ दूर झाला आहे. चाहत्याने कमेंट करत सांगितले की, मालिका संपत नाही आहे. हा फोटो अनिरूद्ध आणि अरुंधतीच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर अरूंधतीने पाहिलेल्या स्वप्नातील आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या लग्नाला २५ वर्ष पूर्ण झाल्यावर मालिकेत त्यांचे पुन्हा एकदा लग्न झालेले दाखवण्यात आले होते. त्यावेळी अरुंधतीने स्वप्नात हे चित्र पाहिले होते. हे समजल्यावर आता प्रेक्षक खूश झाले आहेत.

टॅग्स :आई कुठे काय करते मालिका