Join us

चाहत्यांनी नकुल मेहताला दिले त्याच्या वाढदिवसाचे खास सरप्राईज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 12:26 IST

आपल्या चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण करून ऑनस्क्रीन उत्तम परफॉर्म करणाऱ्या नकुलने आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले आहे. ह्या बर्थडेचे सेलिब्रेशन त्याच्यासाठी नक्कीच खास होते.

'इश्कबाज - प्यार की एक ढिंचॅक कहानी’मधील हार्टथ्रॉब नकुल मेहताने हल्लीच आपला वाढदिवस साजरा केला आणि त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला त्याच्या चाहत्यांकडून शो च्या सेटवर एक सरप्राईज मिळाले.सूत्रांनुसार, नकुलच्या वाढदिवशी खूप सारे केक आले. त्याच्या चाहत्यांनी त्याच्यासाठी खास बनवलेले केक पाठवले होते ते पाहून तो थक्क झाला. त्यांनी त्याच्यासाठी पर्सनलाईज्ड भेटवस्तू आणि पत्रेसुद्धा पाठवली आणि त्याचा वाढदिवस त्याच्यासाठी अविस्मरणीय बनवला. चाहत्यांचे इतके प्रेम पाहून नकुल तर खूपच आनंदात होता. त्याने सर्वांचे मनापासून आभार मानले आणि त्यांच्यासोबत धम्माल केली. आपल्या चाहत्यांच्या मनात खास स्थान निर्माण करून ऑनस्क्रीन उत्तम परफॉर्म करणाऱ्या नकुलने आपले अभिनयकौशल्य सिद्ध केले आहे. ह्या बर्थडेचे सेलिब्रेशन त्याच्यासाठी नक्कीच खास होते.