Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या अभिनेत्रीची अवस्था पाहून चाहते पडले चिंतेत, व्हिडीओ चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2024 16:10 IST

अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून चाहते हैराण झाले आहेत.

बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेत्री आरती सोळंकी (Aarti Solanki) सतत चर्चेत येत असते. काही महिन्यांपूर्वी तिने तिच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांना थक्क केले होते. तिने जवळपास ५० किलो वजन घटवले आहे. त्यामुळे तिचा फिटनेस पाहून सर्वजण तिचे कौतुक करत आहेत. दरम्यान आता तिने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, या व्हिडीओत तिची अवस्था पाहून चाहते चिंतेत पडले आहेत. 

आरती सोळंकी हिने वजन घटवून सर्वांना थक्क केले होते. तिच्या ट्रान्सफॉर्मेशनमुळे ती चांगलीच चर्चेत आली होती. त्यानंतर ती सातत्याने सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत होते. दरम्यान आता तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यातील तिचा लूक पाहून सर्व हैराण झाले आहेत. यात तिने तिचे केस बारीक केल्याचे दिसून येत आहे. तिचा हा अवतार पाहून तिला काय झालंय, असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

वर्कफ्रंटआरती सोळंकीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. अनेक रिएलिटी शोमध्येही ती सहभागी झाली होती. 'वृंदावन' या सिनेमातही ती झळकली होती. या शिवाय तिने '४ इडियट','येड्यांची जत्रा','वाजलाच पाहिजे' आणि 'लूज कंट्रोल' या चित्रपटात काम केले आहे. 'ठिपक्यांची रांगोळी' या मालिकेतही ती दिसली होती. शेवटची ती ढोलकीच्या तालावर या शोमध्ये पाहायला मिळाली होती. 

टॅग्स :बिग बॉस मराठी