Join us
Daily Top 2Weekly Top 5

​कुछ रंग प्यार के ऐसे भी फेम शाहीर शेख झळकणार या चित्रपटात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2017 13:06 IST

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेतील देवच्या भूमिकेमुळे शाहीर शेख प्रकाशझोतात आला. त्याच्या या भूमिकेची चांगलीच चर्चा ...

कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेतील देवच्या भूमिकेमुळे शाहीर शेख प्रकाशझोतात आला. त्याच्या या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. या मालिकेतमुळे त्याला प्रचंड फॅन फॉलॉव्हिंग मिळाले. त्याच्या महिला चाहत्यांची संख्या तर प्रचंड आहे. या मालिकेत काम करत असतानाच शाहीर इंडोनेशियामधील मालिकेत काम करत होता. त्यामुळे तो चित्रीकरणासाठी अनेक दिवस इंडोनेशियाला जात असे. कुछ रंग प्यार के ऐसे भी आणि इंडोनेशियातील मालिकेचे एकत्र चित्रीकरण करणे ही त्याच्यासाठी तारेवरची कसरत असायची. त्यामुळे तो कुछ रंग प्यार के ऐसे भी या मालिकेतील काही भागांमध्ये खूप कमी दृश्यांमध्ये दिसायचा. त्यावरून त्याच्या फॅन्सने त्यांची नाराजी सोशल मीडियावरून व्यक्त देखील केली होती. शाहीरची कुछ रंग प्यार के ऐसे भी ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेनंतर त्याने आता इंडोनेशियामधील त्याच्या प्रोजेक्टसवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. शाहीरच्या फॅन्ससाठी आता एक चांगली बातमी आहे. तो लवकरच एका चित्रपटामध्ये झळकणार आहे.शाहीर कोणत्या बॉलिवूडच्या चित्रपटात नव्हे तर इंडोनेशिया मधील एका चित्रपटात झळकणार आहे. त्यानेच ही खुशखबरी त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर त्याने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर पोस्ट केले आहे. एक राजकुमाराची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार असून शाहीर त्या राजकुमाराची भूमिका साकारत आहे. शाहीरने या आधी देखील एका इंडोनेशियन चित्रपटात काम केले होते. त्याने इंडोनेशियाच्या अनेक मालिकांमध्ये देखील महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे शाहीर हा इंडोनेशियामध्ये देखील स्टार आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.  Also Read : कुछ रंग प्यार के ऐसे भी फेम एरिका फर्नांडिस आणि शाहीर शेख खऱ्या आयुष्यातही बेस्ट फ्रेंड्स